शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

शिवसेना-भाजपाचे ‘मिशन १०० प्लस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2016 22:46 IST

निवडणुकीचे पडघम : मनसेसह दोन्ही कॉँग्रेस अस्वस्थ

नाशिक : महापालिका निवडणुकीत चार सदस्यांचा एक प्रभाग होणे आता जवळपास निश्चित झाले असून, लवकरच प्रभाग रचनाही घोषित होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपाने आतापासूनच ढोल वाजवायला सुरुवात केली असून, दोहोंनी स्वबळावर लढण्याचा नारा देत ‘मिशन १०० प्लस’चे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. सेना-भाजपाच्या आक्रमक पवित्र्यामुळे सत्ताधारी मनसेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या गोटात अस्वस्थता वाढली आहे. राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आठवडाभरात प्रभाग रचना जाहीर होण्याचे संकेत दिले आहेत. फेबु्रवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीत तीनपेक्षा कमी नाही किंवा पाचपेक्षा जास्त नाही, अशारितीने बहुसदस्यीय प्रभाग निश्चित केले जाणार आहेत. नाशिक महापालिका निवडणुकीत सन २०११च्या जनगणनेनुसार १२२ सदस्यसंख्या कायम राहण्याची शक्यता आहे. अवघ्या आठ महिन्यांवर महापालिका निवडणूक येऊन ठेपल्याने भाजपासह शिवसेनेने आतापासूनच रणशिंग फुंकले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात भाजपाकडून मंडलनिहाय ‘विकासपर्व’ या नावाने मेळावे आयोजित केले जात असून, मेळाव्यात प्रमुख प्रतिस्पर्धी शिवसेनाच असल्याचे सांगत ‘मिशन १०० प्लस’चा नारा दिला जात आहे, तर शिवसेनेकडूनही पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकांवर जोर दिला जात आहे. शिवसेनेचा येत्या १९ जूनला सुवर्णमहोत्सवी स्थापना दिन असल्याने या दिवशीच निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ वाढविण्याची तयारी सुरू आहे. सेनेत मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यातील नेते-पदाधिकारी व नपा-मनपा सदस्यांच्या प्रवेश सोहळ्याचे संकेत दिले जात आहेत. शिवसेना व भाजपाने आतापासून महापालिका निवडणुकीत आपणच एकमेकांचे प्रतिस्पर्धी असल्याची वातावरणनिर्मिती चालविली असून, सत्ताधारी मनसेसह कॉँग्रेस-राष्ट्रवादीला दुर्लक्षिले आहे. भाजपाकडून सिंहस्थ कुंभमेळा काळात केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचे भांडवल करत शहराच्या विकासात दिलेल्या योगदानाचा मुद्दा प्रभावीपणे मांडला जात आहे. शिवसेनेकडून मात्र भाजपाला लक्ष्य करत केंद्र व राज्य सरकारमधील भाजपाच्या धोरणांवर टीका करत महागाई, पाणी पळवापळवी आदि मुद्दे उपस्थित केले जात आहेत. सेना-भाजपाने स्वबळावर लढण्याचा नारा देण्यास सुरुवात केली असताना मनसेसह कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत शांतता आहे. गोदापार्कसह वनौषधी उद्यानाच्या उद्घाटनासाठी सत्ताधारी मनसेला राज ठाकरे यांच्या दौऱ्याची प्रतीक्षा लागून आहे, तर कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस गटबाजीमुळे हैराण आहे. (प्रतिनिधी)