शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना-भाजपा स्वबळावर लढणार

By admin | Updated: August 6, 2016 01:15 IST

प्रभाग ३५-३६ पोटनिवडणूक : इच्छुकांच्या बैठका सुरू

नाशिकरोड : जेलरोड प्रभाग ३५ व ३६ च्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना, भाजपाने इच्छुकांच्या बैठका घेऊन स्वबळाच्या जोरावर निवडणुकीची तयारी चालविली आहे. मनसेची बैठक घेऊन निवडणूक लढण्याचे निश्चित केले आहे. तर गेल्या निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादी अशी आघाडी असलेले दोन्ही पक्ष अद्याप ‘कोमात’ असल्याचे चित्र दिसत आहे.प्रभाग ३५ ब मधून शोभना शिंदे व प्रभाग ३६ ब मधून नीलेश शेलार हे मनसेकडून निवडून आल्यानंतर गेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत पक्षाचा व्हीप झुगारला म्हणून त्या दोघांचे नगरसेवक पद रद्दबातल ठरविले गेले होते.प्रभाग ३५, ३६ ब च्या पोटनिवडणुकीकरिता येत्या २८ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकांना सर्वच पक्ष, पदाधिकारी, इच्छुकांचा विरोध होता. पक्षाची व पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार असल्यामुळे प्रारंभी फारसा रस राजकीय पक्ष, पदाधिकारी, इच्छुक दाखवत नव्हते. मात्र आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय पक्षासह इच्छुकांनी हालचाली करण्यास सुरुवात केली आहे. तीन दिवसांपासून उमेदवारी अर्ज विक्री व भरून देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून प्रभाग ३५ मध्ये १३ व प्रभाग ३६ मध्ये १७ असे एकूण ३० उमेदवारी अर्ज विक्री झाले आहेत; मात्र अद्याप एकानेही उमेदवारी अर्ज भरला नाही. कॉँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष अद्याप झोपेतून जागा झालेला नसल्याची स्थिती आहे. गेल्या निवडणुकीत दोघांनी आघाडी करून निवडणूक लढविली होती; मात्र पोटनिवडणुकीत आघाडी होणार की नाही किंवा स्वतंत्र निवडणूक लढवायची याबाबत अद्यापही बैठक न झाल्याने दोन्ही पक्ष अद्याप कोमात असल्याचे चित्र दिसत आहे. (प्रतिनिधी)