शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना-भाजप ठरवेल मालेगावचा महापौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 01:14 IST

मालेगाव महापालिकेच्या महापौरपदासाठी काँग्रेस व महागठबंधन आघाडीच्या गोटातील घडामोडींना वेग आला आहे. शहराच्या पश्चिम भागातील भाजप व शिवसेनेच्या भूमिकेवरच महापौराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकाँग्रेस, महागठबंधन आघाडीच्या गोटात राजकीय हालचालींना वेग

मालेगाव : महापालिकेच्या महापौरपदासाठी काँग्रेस व महागठबंधन आघाडीच्या गोटातील घडामोडींना वेग आला आहे. शहराच्या पश्चिम भागातील भाजप व शिवसेनेच्या भूमिकेवरच महापौराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.मालेगाव महापालिकेत शिवसेना व काँग्रेसची सत्ता आहे. गेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात काँग्रेसचे महापौर रशीद शेख व शिवसेनेचे उपमहापौर सखाराम घोडके यांनी कामकाज पाहिले. १५ डिसेंबर रोजी त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. तत्पूर्वी १२ डिसेंबरला महापौरपदाची निवड केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नामांकन अर्ज विक्रीला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या ताहेरा शेख व महागठबंधन आघाडीच्या जैबुन्नीसा समसुद्दोहा यांनी नामांकन अर्ज घेतला आहे. महापौरपद ओबीसी महिला आरक्षित झाल्याने पुढील अडीच वर्षांसाठी महिला नगरसेवकाला महापौरपदाची संधी मिळणार आहे. काँग्रेसतर्फे माजी महापौर ताहेरा शेख यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे, तर महागठबंधन आघाडीतर्फे जनता दलाच्या शान-ए-हिंद निहाल अहमद यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. शहराच्या पश्चिम भागात काँग्रेस व महागठबंधन आघाडीचे विळ्या-भोपळ्याचे नाते आहे. दोघा पक्षांमध्ये राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर पूर्व भागातील शिवसेनेचे १३ व भाजपचे ९ नगरसेवक किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. महागठबंधन आघाडी व काँग्रेसनेही शिवसेनेला उपमहापौरपद देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र शिवसेना गेली अडीच वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेससोबत जाते की महागठबंधन आघाडीसोबत, याबाबत उत्सुकता आहे. शुक्रवारी रात्री शिवसेनेचे आमदार दादा भुसे मालेगावी येणार आहेत. या पार्श्वभूमीवर महागठबंधन आघाडी व काँग्रेसही त्यांच्याशी संपर्क साधण्याची शक्यता आहे. त्यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर महापौर कोणत्या पक्षाचा होईल, यावर शिक्कामोर्तब होणार आहे. शहराच्या पश्चिम भागातील नगरसेवकच मनपाचा महापौर ठरविण्याची शक्यता आहे. राज्याच्या राजकारणातील उलथापालथीचा अनुभव सगळ्यांनीच घेतला आहे. शहराच्या पूर्व भागातील कट्टरविरोधक असलेल्या काँगे्रस व महागठबंधन आघाडीसुद्धा वाटाघाटी करून महापौर व उपमहापौर ठरविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजप व शिवसेनेला सत्तेपासून रोखण्याच्याही हालचाली सुरू झाल्या आहेत.

टॅग्स :MalegaonमालेगांवMayorमहापौरElectionनिवडणूक