शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

शहरात शिवजयंती मिरवणूक

By admin | Updated: March 9, 2015 01:01 IST

शहरात शिवजयंती मिरवणूक

नाशिक : ‘जय भवानी..जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणा, गुलालाची उधळण, ढोल-ताशांचा गजर जोडीला डिजेचा दणदणाट, आकर्षक विद्युत रोषणाई आणि यामध्ये बेभान होऊन नाचणारी तरुणाई अशा उत्साहपूर्ण वातावरणात शहरात शिवजयंती मिरवणूक पार पडली.पारंपरिक मार्ग वाकडी बारव येथून महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. अकरा शिव मंडळांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला. त्यातील तीन मंडळांनी जिवंत देखावा सादर केला, तर जवळपास सर्वच मंडळांनी डिजेच्या तालावर तरुणाईला थिरकण्यास भाग पाडले. या मिरवणुकीच्या प्रारंभी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा चित्ररथ होता़ त्यापाठोपाठ शिवसाई फ्रेंड सर्कल, लष्कर-ए-शिवबा ग्रुप, स्वराज्य प्रतिष्ठान, हिंदू एकता आंदोलन पक्ष, शहीद भगतसिंग क्रांती दल, नगरसेवक विनायक पांडे यांचे शिवसेवा मित्र मंडळ, माजी आमदार वसंत गिते यांचे मुंबई नाका युवक मित्रमंडळ, नगरसेवक सचिन मराठे यांचे अर्जुन क्रीडा मंडळ, जुने नाशिक फ्रेंड सर्कल, आत्मविश्वास व्यायामशाळा, असे अकरा चित्ररथ या मिरवणुकीत सहभागी झाले होते़दुपारी साडेचारपासून सुरू झालेली मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान, न्यायालयाच्या नियमाप्रमाणे रात्री १० वाजता पोलिसांनी सर्व वाद्ये बंद करण्यात केली़ यानंतर मिरवणूक शांततेत मार्गस्थ झाली. वाकडी बारव, भद्रकाली, मेनरोड, धुमाळ पॉइंट, रविवार कारंजामार्गे पंचवटी असा मिरवणुकीचा मार्ग होता. पोलीस उपआयुक्त वारगळ, सहायक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर, भद्रकालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली व पंचवटी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, रात्री १० वाजता वाद्य बंद केल्यानंतर कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. तर काही मंडळांचे चित्ररथ हे माघारी फिरले. (प्रतिनिधी)