येवला : शहरात शासनाच्या वतीने शिवभोजन थाळी केंद्र या उपक्र माचा शुभारंभ करण्यात आला. शहरातील मुख्य भाग असणाऱ्या जुन्या पंचायत समितीसमोर विंचूर रोड येथे श्री महालक्ष्मी बहुउद्देशीय महिला बचत गटाच्या वतीने, तर संजीवनी मजूर सहकारी संस्थेच्या वतीने ग्रामीण रुग्णालयाजवळ फत्तेबुरूज नाका येथे हे शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यात आले आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळात हे केंद्र सुरू राहणार आहे. यावेळी तहसीलदार रोहिदास वारूळे, बाळासाहेब लोखंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक लोणारी, प्रवीण पहिलवान, श्याम तांबे, सचिन सोनवणे, विनोद पाटील, गोटू मांजरे आदी उपस्थित होते.
येवल्यात शिवभोजन थाळी केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 17:19 IST