शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून शिरपूर पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 17:47 IST

सटाणा : बागलाण तालुक्यातील आदर्शगाव म्हणून नोंद झालेले किकवारी खुर्द कमी पर्जन्यमानमुळे गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाशी सामना करत आहे.

सटाणा : बागलाण तालुक्यातील आदर्शगाव म्हणून नोंद झालेले किकवारी खुर्द कमी पर्जन्यमानमुळे गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाशी सामना करत आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी वाहून जाणारे पाणी अडवणे आवश्यक आहे,यासाठी लोकप्रतिनिधींचे उंबरठे झिजविले मात्र गावकऱ्यांच्या पदरी निराशाच आली. अखेर वेळ न दवडता किकवारीकरांनी लोकसहभागातून पावसाळ्यापूर्वीच हत्ती नदीपात्र, ब्राम्हणदरा , वाघदर नाल्याचे तब्बल दीड किलोमीटर खोलीकरण करून पुनर्जीवन केले. या शिरपूर पॅटर्नमुळे पावसाचा वाहून जाणारा प्रत्येक थेंब अडवला जाणार आहे. परिणामी, भविष्यात किकवारी खुर्द परिसरातील सहा किलोमीटर परिसरातील आठ ते नऊशे हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असल्याने या एकजुटीमुळे किकवारीकरांनी एक नवा आदर्श घालून दिला आहे.आदर्शगाव किकवारी खुर्द परिसर म्हणजे एकेकाळी पावसाचे आगर होते. मात्र गेल्या दोन ते तीन वर्षापासून पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरींनी तळ गाठला. नदी,नाले,धरणे कोरडी पडली. शेती हाच मुख्य व्यवसाय असल्यामुळे पाण्याअभावी शेती व्यवसाय धोक्यात सापडला. दुष्काळ निवारणासाठी शासन उपयोजना करेल, बागलाण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शासन काहीतरी ठोस पाऊले उचलून जलसंधारणेची कामे करेल अशी आशा किकवारीकरांना होती. मात्र पदरी निराशाच पडल्यानंतर शासनाच्या निधीची व मदतीची अपेक्षा न करता लोकसहभाग व लोकवर्गणीच्या माध्यमातून गाव पुढे सरसावले. आदर्श ग्रामचे शिल्पकार केदा बापू काकुळते यांनी ग्रामसभा घेऊन आपली भूमिका मांडली व सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत लोकवर्गणी जमा केली. गावाला लाभलेल्या दीड किलोमीटर लांबीच्या हत्ती नदीवर जेसीबीने खोलीकरण करून नदीचे पुनर्जीवन केले. तसेच गावाच्या उत्तरेस असलेल्या ब्राम्हणदर, वाघदर या नाल्याचे खोलीकरण करून ठिकठिकाणी बांध घातले. त्यामुळे पावसाचा प्रत्येक थेंब अडवून भूजलपातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Waterपाणी