सिन्नर : शिंदे येथील चतुर्विध साधन सेवा मंडळाच्या वतीने शिंदे ते श्रीक्षेत्र जाळीचा देवस्थान दर्शन व समाज प्रबोधन पदयात्रेस उत्साहात प्रारंभ झाला. पदयात्रेचे हे १५ वे वर्ष आहे.दररोज किमान २० किलोमीटरचा प्रवास करत ही पदयात्रा सुळेवाडी, म्हाळसाकोरे, विंचूर, नांदगाव, चाळीसगाव, कनाशी, पाचोरा, अजिंठा, म्हसरूळमार्गे दि. २१ फेबु्रवारी रोजी जाळीचा देव येथे पोहचणार आहे. ठिकठिकाणी पदयात्रेचे स्वागत केले जाते. विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून हा पद यात्रेचा यात्रोत्सव साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी विशेष सोहळ्याद्वारे पदयात्रेची सांगता करण्यात येणार आहे. महंत वाल्हेराज बाबा कुंफेकर, भिका सोनवणे, दगू गामणे यांच्या नियोजनाखालील पदयात्रेत सुमारे ३५० भाविक सहभागी झाले आहेत. पदयात्रा सुरूकरण्यापूर्वी सुबध्द नियोजन केले जाते. मंगळवारी पदयात्रेचे बारागाव पिंप्री येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. या प्रसंगी दत्ता गोसावी, बाळासाहेब अंजनगावकर, विठ्ठल गोराडे, दत्ता जोशी, शंकर गोसावी, काजल गोसावी आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
शिंदे ते जाळीचा देव प्रबोधन यात्रेस प्रारंभ
By admin | Updated: February 3, 2016 22:24 IST