शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विद्यापीठातर्फे शिनगारे यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 01:18 IST

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे सेवानिवृत्त संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांचा महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे सत्कार करण्यात आला. विद्यापीठाच्या अनेक प्रश्नांवर शिनगारे यांची भूमिका नेहमीच सहकार्याची राहिली आहेच शिवाय त्यांनी विद्यापीठासंदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याची आठवण यावेळी अनेकांनी सांगितली.

नाशिक : वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे सेवानिवृत्त संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांचा महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे सत्कार करण्यात आला. विद्यापीठाच्या अनेक प्रश्नांवर शिनगारे यांची भूमिका नेहमीच सहकार्याची राहिली आहेच शिवाय त्यांनी विद्यापीठासंदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याची आठवण यावेळी अनेकांनी सांगितली.विद्यापीठाच्या सभागृहात कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या हस्ते शिनगारे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. सुरेश पाटणकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. राजेश गोंधळेकर, राजश्री नाईक, डॉ. श्रीराम सावरीकर, डॉ. अजय वंदनवाले, डॉ. अजित गोपछडे, डॉ. जे. जे. पवार, डॉ. मनीषा कोठेकर, डॉ. जयंत पळसकर, डॉ. धनाजी बागल, एन. व्ही. कळसकर, डॉ. संदीप गुंडरे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी प्रति-कुलगुरू मोहन खामगावकर यांनी कार्यालयीन कामकाजात नियमांचे काटेकोर पालन करून प्रश्न सोडविण्यात डॉ. शिनगारे कुशल असल्याचे म्हटले. कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. श्रीराम सावरीकर यांनीदेखील यावेळी मनोगत व्यक्तकेले.सत्काराला उत्तर देताना शिनगारे यांनी विद्यापीठाशी आपले कौटुंबिक संबंध असल्याचे म्हटले. विद्यापीठात काम करताना बरेच अनुभव आले. हाच आनंद प्रेरणादायी होता, असे ते म्हणाले.याप्रसंगी परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, संजय नेरकर, यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. आभार ए. व्ही. कळसकर यांनी मानले.प्रश्न सोडविण्यास  केली मोठी मदतकुलगुरू डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले, विद्यापीठाच्या स्थापनेपासून डॉ. प्रवीण शिनगारे यांचा विविध कामकाजात मोलाचा वाटा राहिला आहे. विद्यापीठाच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महत्त्वाचे सल्ले देण्याबरोबरच मदतदेखील केली आहे.

टॅग्स :universityविद्यापीठNashikनाशिक