शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्यात मेंढपाळ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 14:33 IST

जायखेडा : द्याने (ता. बागलाण) येथील बोळाई शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मेंढपाळ गंभीर जखमी झाला आहे.

जायखेडा : द्याने (ता. बागलाण) येथील बोळाई शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मेंढपाळ गंभीर जखमी झाला आहे. जखमींवर नामपूर येथील खासगी रु ग्णालयात उपचार सुरु आहेत.द्याने येथील बोळाई शिवारातील शेतकरी अशोक भिवसन कापडणीस यांच्या कांद्याच्या शेतात मेंढपाळांचा वाडा मुक्कामी आहे. मेंढपाळ भुरा लहानू पधारे यांची पत्नी व लहान मुलगा बाहेरगावी गेले असल्याने ते रात्री आपल्या मेंढ्यांच्या कळपाजवळ झोपले होते. बुधवार २७ रोजी रात्री दीड ते दोनच्या सुमारास बिबट्याने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला चढविला. यावेळी मेंढ्यांच्या ओरडण्याचा आवाज एकूण पधारे हे झोपेतून उठून बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न करीत असतांना बिबट्याने मेंढपाळावर जोरदार हल्ला चढवून त्यांच्या डोळ्याजवळ व कपाळावर गंभीर इजा करून जखमी केले. बिबट्याच्या कचाट्यात सापडलेल्या मेंढपाळाने आपला जीव वाचविण्यासाठी जोरजोरात आकांता केल्याने शेतमालक अशोक कापडणीस, पंकज कापडणीस, केदा हलन्नोर, विठ्ठल कापडणीस, केदा कापडणीस हे धावून आले. त्यांनी विजेचा प्रकाश व आरडाओरडा करून बिबट्याला हुसकावून लावल्याने मोठा अनर्थ टळला व सुदैवाने मेंढपाळाचे प्राण वाचले. मेंढपाळाच्या डोळ्याजवळ व शरीरावर ठिकठिकाणी गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर नामपूर येथील खासगी रु ग्णालयात उपचार सुरु आहेत. वनविभागाकडून प्रथमोपचारासाठी तातडीची मदत म्हणून पाच हजार रु पये देण्यात आले आहेत. बिबट्याच्या दहशतीने बोळाई शिवारातील शेतकरी, शेतमजूर प्रचंड घाबरले आहेत. यामुळे वनविभागाने लवकरात लवकर बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक