शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

खामखेडा शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात मेंढी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 16:37 IST

देवळा परिसर : शेतकरी वर्गात दहशत

ठळक मुद्देखामखेडा येथील संतोष विठ्ठल बच्छाव यांचा मेंढपाळ व्यवसाय आहे. त्यांच्या मेंढ्यांचा खामखेडा येथील शेतकरी भिका नथु शेवाळे यांच्या शेतात रात्रीचा मुक्काम होता.

खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा शिनालमोक शिवारात बिबटयाच्या हल्ल्यात एका मेंढीचा बळी गेल्याची घटना घडली असून बिबट्याच्या संचारामुळे परिसरातील शेतकरी वर्गात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.खामखेडा येथे धनगर समाजाचे लोकांचे वास्तव्य असून ते शेतीबरोबर जोड व्यवसाय म्हणून मेंढी पालन व्यवसाय करतात. दिवसभर मेंढ्या चारून रात्री शेतकऱ्यांच्या शेतात बसवितात . त्यामुळे शेतक-यांना शेतीसाठी खत मिळते. या खतांच्या मोबदल्यात या मेंढपाळाना पैसे किंवा धान्य दिले जाते. त्यावर सदर मेंढपाळ आपला उदरिनर्वाह करतात. खामखेडा येथील संतोष विठ्ठल बच्छाव यांचा मेंढपाळ व्यवसाय आहे. त्यांच्या मेंढ्यांचा खामखेडा येथील शेतकरी भिका नथु शेवाळे यांच्या शेतात रात्रीचा मुक्काम होता. रविवारी (दि.१४) रात्रीच्या सुमारास बिबटयाने या मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला . बिबट्याची चाहूल लागताच मेंढपाळांनी आरडाओरड केली असता आवाजाने बिबट्याने तिथून पलायन केले. बिबटयाच्या हल्यात एक मेंढी ठार झाली. सोमवारी सकाळी वनपाल आहेर यांना या घटनेची भ्रमणध्वनीवर माहिती देण्यात आली. वनपाल आहेर यांनी घटनस्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांना या बिबटयाच्या पाऊलांचे ठसे आढळून आले. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. महाले यांना यांनी पाचारण करण्यात येऊन पंचनामा करण्यात आला.

टॅग्स :Nashikनाशिक