सातपूर : सोमवारी माकपा, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी सह अन्य पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांनी परिसरातून फेरी काढत बंदचे आवाहन केल्याने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला सातपूर विभागात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सर्वसामान्य मेटाकुटीस आले आहेत. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सर्व विरोधी पक्षांनी सोमवारी भारत बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला सातपूर परिसरातील व्यापारी, व्यावसायिकांनी आपापले व्यवहार बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला होता. सातपूर गावातील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडई, सातपूर कॉलनीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट, अशोकनगर येथील भाजीमंडई आदींसह परिसरातील गजबजलेले ठिकाणी शुकशुकाट पसरला होता. शाळा, महाविद्यालये पूर्ववत होत्या.
सातपूरला दिवसभर शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 01:16 IST