नाशिक : दिल्लीत पार पडलेल्या ‘मिस टिन युनिव्हर्स इंडिया-२०१७’ सौंदर्य स्पर्धेत नाशिकची श्रीया तोरणे हिला ‘मिस टिजीपिसी एलिट-२०१७’ चा पुरस्कार मिळाला आहे, तर भैरवी बुरड ही मिस ग्लोबल इंटरनॅशनल ठरली. आपापल्या गटात विजेतेपद पटकविल्याने या दोन्ही नाशिककर कन्या आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पुढील वर्षी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. श्रिया सृष्टी कौरला हरवून नवीन ‘मिस टिन युनिव्हर्स’ बनली आहे. मुख्य स्पर्धेव्यतिरिक्त श्रिया हिला ‘मिस ब्यूटिफूल आईज’ हे मानांकनही मिळाले आहे. श्रियाला ‘बेस्ट इन पार्टीवेअर बेस्ट’ म्हणून गौरवण्यात आले. तिला रितिका रामित्री यांच्याकडून पेजंटसाठी तयार करण्यात आले होते. भैरवी बुरड हिने या स्पर्धेत मिस ग्लोबल इंटरनॅशनल हे विजेतेपद आणि बेस्ट रॅम्प, बेस्ट कंजुनीअॅलिटी हा किताब पटकावला आहे. मिस टीजीपीसी या आॅनलाइन पेजंटमध्ये २०१६ साली भैरवीने, तर २०१७ साली श्रियाने विजेतेपद पटकावले होते.
नाशिकच्या श्रिया तोरणे, भैरवी बुरड राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत विजेत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:13 IST