नाशिक : सोशल नेटवर्किंग साइटवरील यूट्यूबवर एटीएम फोडण्याच्या व्हिडीओपासून प्रेरणा घेत दोघा संशयितांनी शरणपूर रोडवरील कुलकर्णी गार्डनजवळील स्टेट बँक आॅफ इंडियाचे एटीएम फोडल्याची घटना शुक्रवारी (दि़ १) पहाटेच्या सुमारास घडली़ मात्र, या घटनेची माहिती सरकारवाडा पोलिसांना मिळताच त्यांनी या दोघांना रंगेहाथ पकडल्याने पुढील अनर्थ टळला़ अमित साहेबराव गवई (वय २४, रा. श्याम अपार्टमेंट, पी अॅण्ड टी कॉलनी, तिबेटियन मार्केटजवळ, नाशिक) व किरण रघुनाथ मोरे (२२, रा. कृष्णा हाईट्स, शिवगंगानगर, रिलायन्स पेट्रोलपंपासमोर, दिंडोरी रोड, पंचवटी) अशी अटक केलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत़शरणपूर रोडवरील कुलकर्णी गार्डनसमोर स्टेट बँक आॅफ इंडियाचे ई कॉर्नर एटीएम आहे़ शुक्रवारी पहाटे साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास संशयित गवई व मोरे या दोघा संशयितांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला़ या दोघांचे एटीएम फोडण्याचे काम सुरू असताना ही माहिती एकाने पोलीस नियंत्रण कक्षास कळविल्यानंतर त्यांनी तत्काळ सरकारवाडा पोलीस ठाण्यास माहिती दिली़ याच दरम्यान नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक वळवी, पोलीस कर्मचारी ठाकरे व मोरे हे काही वेळातच कुलकर्णी गार्डनजवळ पोहोचले, तर त्याच वेळी सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सोनोन हे गस्तीपथकासह घटनास्थळी दाखल झाले़ दरम्यान, या दोघा संशयितांपैकी एकजण हा वन कर्मचाºयाचा मुलगा असून, दुसरा रुग्णालयात कामास आहे़ या दोघांनीही यूट्यूबवरील व्हिडीओ पाहून हा प्रकार केल्याची माहिती पोलिसांनी दिली़ या दोघांवरही सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरणपूररोड : सोशल नेटवर्किंग साइडचा दुरुपयोग यूट्यूबवर व्हिडीओ पाहून दोघांनी फोडले एटीएम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:47 IST
सोशल नेटवर्किंग साइटवरील यूट्यूबवर एटीएम फोडण्याच्या व्हिडीओपासून प्रेरणा घेत दोघा संशयितांनी शरणपूर रोडवरील कुलकर्णी गार्डनजवळील स्टेट बँक आॅफ इंडियाचे एटीएम फोडल्याची घटना शुक्रवारी (दि़ १) पहाटेच्या सुमारास घडली़
शरणपूररोड : सोशल नेटवर्किंग साइडचा दुरुपयोग यूट्यूबवर व्हिडीओ पाहून दोघांनी फोडले एटीएम
ठळक मुद्देदोघांना रंगेहाथ पकडल्याने अनर्थ टळला़गस्तीपथकासह घटनास्थळी दाखल