शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शरणपूररोड-गंगापूररोड : पोलिसांची विशेष नाकाबंदी मोहीम; एकही संशयित आला नाही हाती ४२३ बेशिस्त वाहनचालकांकडून एक लाखाचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:26 IST

शरणपूररोड, कॉलेजरोड व गंगापूररोड परिसर हा उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखला जातो.

ठळक मुद्देबेशिस्त वाहनचालकांचा उपद्रव४२३ वाहनचालकांवर गुन्हे तब्बल ७८ वाहने जमा

नाशिक : शरणपूररोड, कॉलेजरोड व गंगापूररोड परिसर हा उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखला जातो. या भागात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी शहर पोलिसांनी विशेष नाकाबंदी मोहीम सोमवारी (दि.११) राबविली. दरम्यान, ४२३ बेशिस्त वाहनचालकांकडून यावेळी १ लाख २३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.कॉलेजरोड, शरणपूररोड, येवलेकर मळा, विसेमळा, गंगापूररोड, जेहान सर्कल आदी परिसरात सोनसाखळी चोरी, दुुचाकीचोरी, कारफोडीसारख्या वाढत्या गुन्हेगारी घटनांसोबत बेशिस्त वाहनचालकांचा उपद्रवही वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. यााबबत वारंवार पोलिस आयुक्तांकडे प्राप्त होणाºया तक्रारीनुसार पोलीस प्रशासनाने या भागात सोमवारी विशेष नाकाबंदी मोहीम आखली. या मोहिमेदरम्यान बेशिस्त वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात आला. सुमारे ४२३ वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या नाकाबंदीदरम्यान मात्र सोनसाखळी चोरट्यांसह अन्य गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले एकही संशयित पोलिसांच्या हाती लागला नाही. विशेष म्हणजे रविवारी रात्री गंगापूररोड परिसरात एका लॉन्सच्या बाहेर दोन कारच्या काच फोडून चोरट्यांनी तब्बल दोन लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. या घटनेचा छडा लावण्यासाठी मोहीम राबविल्याची चर्चा होती; मात्र नाकाबंदीच्या सापळ्यात चोरटे अडकले नाही. या नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी विविध पॉइंटवरून तब्बल ७८ वाहने जमा केली. नाकाबंदी मोहिमेत वाहनाची कागदपत्रे जवळ न बाळगणे, वीमा न उतरविणे, हेल्मेट परिधान न करणे, परवाना सोबत न ठेवणे अथवा विना परवाना वाहन चालविणे, वेग मर्यादेचे पालन न करणे, सीटबेल्टचा वापर टाळणे आदी प्रकारानुसार मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आल्याची माहिती उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली.