उद्यापासून शरणपूररोड वाहतुकीसाठी बंदश्रावणी सोमवार : मेळा स्थानक-ठक्कर बाजार रस्त्यावर एकेरी वाहतूकनाशिक : तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त मेळा बसस्थानकातून त्र्यंबके श्वर येथे मोठ्या संख्येने भाविक रवाना होतात. यामुळे मेळा स्थानकाच्या परिसरात प्रचंड गर्दी होत असते. यामुळे अपघातांना निमंत्रण मिळू नये व वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने रविवारी दुपारी २ वाजेपासून सीबीएस ते टिळकवाडी सिग्नलपर्यंत शरणपूररोड वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे.मेळा बसस्थानकावरून त्र्यंबकेश्वरकडे महामंडळामार्फत जादा बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सालाबादप्रमाणे ब्रह्मगिरीच्या फेरीसाठी व त्र्यंबकराजाचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता मेळा स्थानकाच्या आवारात वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ म्हणून सीबीएसपासून थेट टिळकवाडी सिग्नलपर्यंतचा रस्ता शहर बस वाहतूक व अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून अन्य सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहे. रविवारी दुपारी २ वाजेपासून या वाहतूक नियंत्रण अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे पोलीस उपआयुक्त विजय पाटील यांनी अधिसूचनेत म्हटले आहे. या नियमाची अंमलबजावणी सोमवारी रात्री ८ वाजेपर्यंत केली जाणार असून, नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. ठक्कर बाजार ते मेळा स्थानकापर्यंतचा रस्त्यावरून दुहेरी वाहतूक बंद करण्यात येणार असून, एकेरी वाहतूक सुरू राहणार आहे. एकूणच या रस्त्यावरून केवळ महामंडळाच्या बसेस धावणार आहेत.
उद्यापासून शरणपूररोड वाहतुकीसाठी बंद
By admin | Updated: August 28, 2015 23:18 IST