शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक शहरात लवकरच ‘झोपू’ योजना ; महापालिकेच्यावतीने शासनाला प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 01:00 IST

शहरातील सुमारे १६० झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा लवकरच सुटणार असून यासाठी नियमावलीत स्थगित झोपू नियमावलीस तातडीने मंजुरी द्यावी यासाठी महापालिकेच्या वतीने शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आले असून प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आयुक्तांना सर्वाधिकार असणार आहेत.

नाशिक : शहरातील सुमारे १६० झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा लवकरच सुटणार असून यासाठी नियमावलीत स्थगित झोपू नियमावलीस तातडीने मंजुरी द्यावी यासाठी महापालिकेच्या वतीने शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आले असून प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आयुक्तांना सर्वाधिकार असणार आहेत. या योजनेमुळे झोपडपट्टीत राहणाऱ्या सुमारे दोन लाख नागरिकांना हक्काचे घर मिळण्याची शक्यता आहे.  मुंबई आणि ठाण्याच्या धर्तीवर नाशिकशहरात झोपडपट्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. त्यानुसार नाशिक शहराचा दुसरा विकास आराखडा तयार करून शासनाकडे पाठविण्यात आल्यानंतर राज्यशासनाने तो २३ मे २०१५ रोजी भागश: मंजूर केला असला तरी विकास नियंत्रण नियमावलीत सादर करण्यात आलेली झोपडपट्टी पुनर्वसन नियमावली मात्र स्थगित ठेवण्यात आली असून, ती अद्याप मंजूर करण्यात आलेली नाही. दरम्यान, महापालिकेने २०१७-१८ मध्ये शहरातील झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण केले. त्यात १६७ झोपडपट्ट्या आढळलेल्या असून, त्यातील आठ झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यात केंद्र सरकारच्या शहरी गरिबांना घरे देण्याच्या योजनेत लाभ देण्यात आला आहे.उर्वरित १५९ झोपडपट्ट्यांसाठी पंतप्रधान आवास योजनेत समावेश करण्यात आला आहे. या झोपडपट्ट्यात ५५ हजार ५२० कुटूंब असून, १ लाख ९४ हजार ३६८ इतकी लोकसंख्या आहे. या सर्वांना झोपू योजनेत घरे मिळणार आहेत. यासंदर्भात आयुक्ततुकाराम मुंढे यांनी शासनास पत्र पाठविले असून, त्यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प मंजूर करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. या योजनेसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन केले जाते. त्यात प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात. महापालिकेने प्रस्ताव पाठविताना महापालिका आयुक्तांचीच सीईओपदी नियुक्तीची शिफारस केली आहे. त्याचबरोबर अन्य काही बदलही केले असून झोपडपट्टीतील नागरिकांना त्यांच्या सध्याच्या क्षेत्राच्या तुलनेत किमान क्षेत्रफळ किती असावे याबाबतची तरतूद असलेली नवी नियमावली असणार आहे. अशाप्रकारच्या प्रस्ताव मंजुरीमुळे शहरातील दीडशेहून अधिक झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना इमारतीत सदनिका मिळणार असून, शहरे स्मार्ट होण्यास मदत मिळणार असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.आठ हजार कुटुंबांना मिळाला लाभमहापालिकेने यापूर्वी केंद्र शासनाच्या शहरी गरिबांसाठी घरे योजनेअंतर्गत केवळ शासकीय आणि निमशासकीय जागांवर असलेल्या झोपडपट्ट्यांसाठी योजना राबविली होती. त्यात सुमारे आठ हजार कुटुंबांना लाभ मिळाला आहे. मात्र, झोपडपट्टीवासीयांच्या राहत्या घराच्या ठिकाणी घरे नसल्याने मोठी अडचण झाली होती, परंतु आता नव्या योजनेत आहे त्याच भागात घरे मिळतील.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका