शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

देवळ्यात शाकंभरी पौर्णिमा उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 16:10 IST

धार्मिक कार्यक्रम : भागवत पुराणावर प्रवचनमाला

ठळक मुद्दे ह्या वर्षी दि. १४ ते २१ जानेवारी ह्या कालावधीत उत्सव साजरा करण्यात आला. उत्सव काळात शोभायात्रा, नवचंडीयाग, भागवत कथा आदी कार्यक्र म झाले.

देवळा : येथील ग्रामदैवत दुर्गामाता मंदिरात शाकंभरी पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आठवडाभर विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्र माच्या सांगता प्रसंगी दुर्मिळ कंदमुळे, रानभाज्या,व भाजीपाला एकत्र करून तयार केलेल्या महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला.गुरूमाउली स्वर्गीय शिवानंद महाराज यांच्या प्रेरणेतून २३ वर्षांपूर्वी दुर्गामाता मंदिरात शाकंभरी पौर्णिमा उत्सव सुरू करण्यात आल्यानंतर दरवर्षी तो नियमितपणे साजरा केला जात आहे. ह्या वर्षी दि. १४ ते २१ जानेवारी ह्या कालावधीत उत्सव साजरा करण्यात आला. उत्सव काळात शोभायात्रा, नवचंडीयाग, भागवत कथा आदी कार्यक्र म झाले. कु. अनुराधा दिदी यांनी उत्सव काळात नित्यनियमाने सायंकाळी साडेसात ते अकरा हया वेळेत भागवत पुराणावर प्रवचन दिले. यावेळी पंचक्र ोशीतील भाविकांनी प्रवचनाचा लाभ घेतला. शोभायात्रेने उत्सवास प्रारंभ होउन अखेरच्या दिवशी महाप्रसादाने सांगता करण्यात आली. यावेळी स्व. शिवानंद महाराज यांची पत्नी श्रीमती शकुंतला ताई पाटील, दिपक पाटील यांना सत्संग सेवा समितीच्यावतीने सन्मानित करण्यात आले. दिनेशिगरी महाराज यांच्या प्रवचनाने उत्सवाची सांगता करण्यात आली. शाकंभरी पौर्णिमा उत्सवाचे आयोजन ग्रामस्थ, व सत्संग सेवा समितीच्यावतीने करण्यात आले होते.१२५ भाजी-कंदमुळांचा महाप्रसादयावेळी वराह कंद, नवल कंद, बांबू कंद, कमळ कंद, चंदन वाटवा, चांदणी वेल, रूद्राक्ष, फणस, पुनर्नवा, राजहंस, कुशमाडा, केतकी फुल, काचीन फुल आदी दुर्मिळ कंदमुळे, रानभाज्या, व भाज्यांसह १२५ प्रकारचा भाजीपाला जमा करून त्याची एकत्रित भाजी करण्यात आली होती. ह्या तयार केलेल्या महाप्रसादाचा लाभ  हजारो नागरिकांनी घेतला. देवळा येथे शाकंभरी पौर्णिमेचा साजरा केला जाणारा हा उत्सव त्याच्या विशिष्ठ पद्धतीने तयार करण्यात येणाऱ्या महाप्रसादामुळे सर्वदूर प्रसिद्ध असून जिल्हाभरातून असंख्य भाविक हया उत्सवाला हजेरी लावतात.

टॅग्स :Nashikनाशिक