शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

शाकंभरी देवी यात्रा आज नाशकात

By admin | Updated: December 28, 2016 01:30 IST

शाकंभरी देवी यात्रा आज नाशकात

नाशिक : राजस्थान येथील शाकंभरी मातेच्या मंदिरापासून भारत भ्रमंतीवर प्रथमच निघालेली अखंड ज्योत दिव्य गुणगाण यात्रा बुधवारी (दि.२८) संध्याकाळी नाशकात पोहचणार आहे. यात्रेमध्ये पंधरा ते वीस भाविक असून आकर्षक चित्ररथामध्ये देवीची मूर्ती व अखंड तेवत असलेल्या ज्योतीचा समावेश आहे. राजस्थान येथील शाकंभरी मंदिरापासून नोव्हेंबर महिन्याच्या आठ तारखेला यात्रेचा शुभारंभ करण्यात आला आहे. ही यात्रा एकूण ६४ दिवसांची असून संपूर्ण भारतभरात भ्रमंती करणार आहे. चार दिवसांपूर्वीच शुक्रवारी (दि.२३) या यात्रेचा महाराष्ट्रात प्रवेश झाला असून, गोंदियाहून यात्रा अकोल्यापर्यंत पोहचली आहे. २७ तारखेला यात्रा औरंगाबादमध्ये येणार असून, २८ तारखेला संध्याकाळी धुळे, मालेगावमार्गे नाशकात येणार असल्याची माहिती ताराचंद गुप्ता व श्याम ढेढिया यांनी दिली. संध्याकाळी पाच वाजता मते नर्सरी, गंगापूररोड श्रीकृष्ण हॉल येथे यात्रेकरू चित्ररथासह दाखल होणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. भजन-कीर्तनाचा कार्यक्रम व महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. संध्याकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत भाविकांना यात्रेचे दर्शन घेता येणार आहे. राणेनगर येथील सुमंगल यात्री निवास, श्रीमंगल कॉम्प्लेक्समध्येही भाविक उपस्थित राहू शकता, अशी माहिती संयोजकांनी दिली. (प्रतिनिधी)विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनयात्रा नाशकात आल्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, शाकंभरी देवीचे भजन गायन होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली. ही यात्रा जानेवारी महिन्याच्या ११ तारखेला पुन्हा सकराय धाम राजस्थान येथे पोहचणार आहे. संपूर्ण देशभरात शाकंभरी देवीचे गुणगाण करून भक्त परिवाराला अखंड ज्योतीचे दर्शन घडविणे हा या यात्रेमागील मुख्य उद्देश आहे.