शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

श्रेष्ठींच्या दुर्लक्षामुळेच शेख यांचे राजीनामा नाट्य?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2021 21:26 IST

मालेगाव : गेल्या आठवड्या भरापूर्वी कॉंग्रेसच्या झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात माजी आमदार तथा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रशीद शेख यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर टीकास्त्र सोडताना राजकारणातून निवृत्ती घेईल मात्र इतर पक्षात जाणार नाही, असे विधान केले होते. परंतु कॉंग्रेस पक्ष श्रेष्ठींच्या दुर्लक्षपणामुळेच शेख रशीद यांनी पक्षाच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे नाट्य घडल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.

ठळक मुद्देमालेगाव : आता राजकारणात निवृत्ती की अन्य पक्षांचा पर्याय

मालेगाव : गेल्या आठवड्या भरापूर्वी कॉंग्रेसच्या झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात माजी आमदार तथा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रशीद शेख यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर टीकास्त्र सोडताना राजकारणातून निवृत्ती घेईल मात्र इतर पक्षात जाणार नाही, असे विधान केले होते. परंतु कॉंग्रेस पक्ष श्रेष्ठींच्या दुर्लक्षपणामुळेच शेख रशीद यांनी पक्षाच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे नाट्य घडल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.मालेगावी कॉंग्रेसचा निष्ठावंत गट आहे. स्वातंत्र्य काळानंतर मालेगावचे पूर्व भागातील राजकारण कॉंग्रेस भोवतीच झाल्याचे दिसून आले आहे. माजी आमदार रशीद शेख यांना दोनदा तर त्यांचे पुत्र आसीफ शेख यांना एक वेळेस व हारुण अन्सारी व आयेशा हकीम यांनी प्रत्येकी एक वेळेस कॉंग्रेसतर्फे आमदारकी भुषविली आहे. कॉंग्रेसचे तब्बल पाच वेळा आमदार मालेगाव शहरातून निवडून गेले आहेत. तत्कालीन नगरपालिकेत कॉंग्रेसकडे नगराध्यक्षपद देखील होते. तसेच महापालिकेच्या राजकारणातही कॉंग्रेसचे कायम वर्चस्व दिसून आले आहे. महापालिका स्थापनेच्या दोन दशकांच्या कार्यकाळात कॉंग्रेसने चार वेळा महापौर पद पटकावत महापालिकेची सत्ता हस्तगत केली आहे. सध्या महापालिकेवर कॉंग्रेस व शिवसेनेची सत्ता आहे.

मालेगावी पक्ष बळकट असताना माजी आमदार आसीफ शेख यांच्या पाठोपाठ माजी आमदार रशीद शेख यांनीही पक्ष शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वी शेख यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या मेळाव्यात शेख यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वार्थी राजकारण करीत असल्याचा गंभीर आरोप केला होता. तसेच राजकारणातून सेवानिवृत्ती घेईल; मात्र इतर पक्षात जाणार नाही, असे विधान केले होते.

कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मालेगाव शहर कॉंग्रेसकडे दुर्लक्ष केल्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसचे राजकारण खिळखिळे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या महापालिकेत कॉंग्रेसचे २७ नगरसेवक निवडून गेले आहेत. महापालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांनी येऊन ठेपली असताना कॉंग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाने अचानक प्रकृती अस्वस्थतेचे कारण देत शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत पक्षश्रेष्ठींबाबत नाराजी व्यक्त केली आहे.कार्यकर्ते मात्र बुचकळ्यातवरिष्ठ पातळीवर दबाव आणण्यासाठी माजी आमदार शेख यांनी राजीनामा, तर दिला नाही ना याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आसीफ शेख यांच्या राजकारणाला कुठे दगा, फटका बसू नये म्हणून सावध भूमिका घेत शेख यांनी राजकीय खेळी केल्याचेही बोलले जात आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या घडामोडींमुळे सर्वसामान्य कॉंग्रेसचा कार्यकर्ता पुरता बुचकळ्यात पडला आहे.

टॅग्स :MalegaonमालेगांवMLAआमदार