शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

शहीद अब्दुल हमीद चौकाला नामफलकाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:56 IST

नाशिक : जुने नाशिकमधील पिंजारघाट येथील मुख्य चौक शहीद अब्दुल हमीद यांच्या नावाने वर्षानुवर्षांपासून ओळखला जातो. मात्र, मागील पाच वर्षांपासून या चौकामध्ये शहिदांच्या नावाने फलक उभारण्यासाठी महापालिकेला मुहूर्त मिळालेला नाही. स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर तरी पालिक ा या चौकात फलक उभारून अब्दुल हमीद यांना अभिवादन करेल का? असा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

नाशिक : जुने नाशिकमधील पिंजारघाट येथील मुख्य चौक शहीद अब्दुल हमीद यांच्या नावाने वर्षानुवर्षांपासून ओळखला जातो. मात्र, मागील पाच वर्षांपासून या चौकामध्ये शहिदांच्या नावाने फलक उभारण्यासाठी महापालिकेला मुहूर्त मिळालेला नाही. स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर तरी पालिक ा या चौकात फलक उभारून अब्दुल हमीद यांना अभिवादन करेल का? असा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.शहरातील रिंगरोडपासून सर्वच मध्यवर्ती भागांसह उपनगरांमधील महत्त्वाच्या रस्त्यांवर महापालिकेच्या वतीने नवीन मार्गदर्शक फलक लावण्यात आले आहेत. मात्र, जुने नाशिकमधील या शहीद चौकाची नामफलकाविना उपेक्षा कायम असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शहीद हमीद यांचे शौर्य व बलिदानाचा पालिका प्रशासनाला विसर पडल्याचे बोलले जात आहे. वारंवार मागणी करून व याबाबतीत लक्ष वेधूनदेखील या चौकात फलक बसविला जात नसल्याने तीव्र आश्चर्य व्यक्त होत आहे. रिंगरोडसह महत्त्वाच्या रस्त्यांवर मार्गदर्शक भव्य कमानी, अन्य रस्त्यांवर नवीन मार्गदर्शक फलक, वाहतूक बेटांमध्येही रस्त्यांची दिशा दाखविणारे नामफलक पालिकेने झळकविले आहे. एकीकडे शहरात सर्वत्र नामफलक, मार्गदर्शक फलक झळकत असताना जुने नाशिकमधील शहीद अब्दुल हमीद चौकाला मात्र नामफलकाची प्रतीक्षा कायमच आहे, हे दुर्दैव!शहीद अब्दुल हमीद यांचे शौर्य१९६५ साली झालेल्या भारत-पाक युद्धात पंजाबच्या तारन जिल्ह्यात खेमकरण क्षेत्रात सज्ज असलेले वीर अब्दुल हमीद यांनी पाकिस्तानचे ‘अमेरिकन पॅटर्न टॅँक’ उद्ध्वस्त केले होते. ‘गन माउंटेंड जीप’ जी टॅँकसमोर एखाद्या खेळणीसारखी होती; मात्र अब्दुल हमीद यांनी धैर्याने या जीपद्वारे एक-दोन नव्हे तर तब्बल सात टॅँक नष्ट केले. पळकुट्या पाक सैन्याचा पाठलाग करताना अब्दुल हमीद यांच्या जीपवर बॉम्बगोळा येऊन आदळला. यामध्ये ते जखमी झाले आणि १० सप्टेंबर १९६५ साली वयाच्या ३२ वर्षी त्यांना वीरमरण आले. त्यांना मरणोत्तर परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले आहे.