शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

शहाजहाँनी ईदगाह मैदानात सामूहिक नमाज अदा, भारताच्या प्रगतीसाठी 'दुवा'

By अझहर शेख | Updated: April 11, 2024 15:23 IST

गेल्या महिनाभरापासून रमजान पर्व सुरू होते. यानिमित्ताने समाजबांधवांनी महिनाभर निर्जली उपवास (रोजे) केले.

नाशिक : आपापसांत प्रेम, बंधुभाव, करुणा व माणुसकीची शिकवण देणारी ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद नाशिक शहर व परिसरात मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने गुरुवारी (दि.११) साजरी करण्यात आली. येथील ऐतिहासिक शहाजहांनी ईदगाह मैदानात विशेष नमाजपठणाचा सोहळा शांततेत पार पडला. शहर ए खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी सोहळ्याचे नेतृत्व केले.

गेल्या महिनाभरापासून रमजान पर्व सुरू होते. यानिमित्ताने समाजबांधवांनी महिनाभर निर्जली उपवास (रोजे) केले. 'अल्लाह'च्या उपासनेत स्वतःला अधिकाधिक व्यस्त ठेवण्यास प्राधान्य दिल्याचे बघावयास मिळाले. बुधवारी 30 उपवास पूर्ण होऊन संध्याकाळी रमजान पर्वची सांगता झाली.गुरुवारी पहाटेपासूनच मोहल्ल्यांमध्ये ईदची लगबग सुरू झाली होती. 

ईदगाह मैदानात नमाजपठण सोहळ्याला सकाळी 9 वाजता सुरुवात झाली. ईदगाहकडे येणारे रस्ते गर्दीने फुलून गेले होते.  पारंपरिक नवीन पठाणी कुर्ता, डोक्यावर इस्लामी फेटा, टोपी अशा पोशाखात नागरिक हजारोंच्या संख्येने मैदानात जमले होते. मैदानाच्या दोन्ही प्रवेशद्वारांभोवती शुचिर्भूत (वजु) होण्यासाठी पाण्याचे नळ तात्पुरते बसविण्यात आले होते. सकाळी सव्वा नऊ वाजता मौलाना जफर यांनी प्रवचनाला प्रारंभ केला. त्यांनी रमजान ईद चे महत्व, ईदच्या दिवशी करावयाचे कर्तव्ये, जबाबदाऱ्याविषयी प्रकाश टाकला. दरम्यान, नमाज अदा करण्याअगोदर नागरिकांनी जकात, फित्राची (धान्यदान) रक्कम दान केली. 

सकाळी सव्वा दहा वाजता खतीब ए शहर हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी नमाजपठणाची पद्धत समजावून सांगितली आणि नमाज पठणास सुरुवात केली. विशेष नमाज अदा केल्यानंतर अरबी भाषेतून खतीब यांनी विशेष 'खुतबा' वाचला. यावेळी उपस्थितांनी मौन ठेवत एकाग्रतेने खुतबा ऐकला. यानंतर संपुर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी व भारताच्या उत्तरोत्तर सर्वांगीण प्रगतीकरिता दुवा करण्यात आली. 

प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्यावर आधारित दरुदोसलामचे उपस्थितांनी सामूहिक पठण केले आणि सोहळ्याची सांगता झाली. शहर ए खतीब यांना शुभेच्छा देण्यासाठी खासदार हेमंत गोडसे, मनपा आयुक्त अशोक करंजकर, माजी महापौर विनायक पांडे, ऍड.यतीन वाघ, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Nashikनाशिक