शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शब-ए-मेराज : नमाजपठणासाठी मशिदींमध्ये रात्रभर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 16:27 IST

बुधवारी रात्री शहरातील मशिदींमध्ये वरील सर्व कार्यक्रम उत्साहात पार पडले. रात्री साडेआठ वाजेपासून समाजबांधवांनी मशिदींमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली होती. मुख्य नमाजपठणानंतर मशिदींमध्ये धर्मगुरूंनी ‘मेराज’चे महत्त्व प्रवचनातून विशद केले.

ठळक मुद्देपैगंबरांवर आधारित स्तुतीपर काव्य मैफल ‘खिदमत’कडून गोरगरिबांना अन्न वाटप

नाशिक :इस्लामचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर व अल्लाह यांच्या प्रत्यक्ष भेटीची रात्र म्हणून ओळखली जाणारी ‘शब-ए-मेराज’ बुधवारी (दि.३) शहर व परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांसह पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. यानिमित्त मशिदींसह दर्ग्यांमध्ये समाजबांधवांची रात्री उशिरापर्यंत गर्दी झाली होती.इस्लामी संस्कृतीत शब-ए-मेराज, शब-ए-बरात, शब-ए-कद्र या तीन रात्रींना अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त आहे. या रात्रींचे आगळेवेगळे वैशिष्ट्य धर्मग्रंथ कुराणमध्ये सांगितले गेले आहे. या रात्री एकापाठोपाठ तीन महिन्यांत येतात. अखेरची शब-ए-कद्रची रात्र रमजान पर्वमध्ये साजरी केली जाते. या रात्रींच्या औचित्यावर समाजबांधव मशिदींमध्ये रात्री एकत्र येऊन नमाजपठण, कुराणपठण, दरूदोसलामचे पठण करतात तसेच पैगंबरांवर आधारित स्तुतीपर काव्य मैफलही आयोजित केली जाते.बुधवारी रात्री शहरातील मशिदींमध्ये वरील सर्व कार्यक्रम उत्साहात पार पडले. रात्री साडेआठ वाजेपासून समाजबांधवांनी मशिदींमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली होती. मुख्य नमाजपठणानंतर मशिदींमध्ये धर्मगुरूंनी ‘मेराज’चे महत्त्व प्रवचनातून विशद केले. तसेच मुख्य सोहळ्याचा समारोप विशेष दुवाने करण्यात आला. संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी यावेळी प्रार्थना करण्यात आली. यानिमित्त शहरातील सर्वच मशिदींवर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. शहर व परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.भाविकांची दर्शनासाठी गर्दीशहरातील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांच्या बडी दर्गा, तसेच हजरत सय्यद हसन रांझेशाह यांच्या आनंदवली दर्गा, पांडवलेणी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या हजरत सय्यद मलिकशाह हुसेनी बाबा यांच्या दर्ग्यावर दर्शन घेण्यासाठी भाविकांची रात्री उशिरापर्यंत गर्दी दिसून आली.‘खिदमत’कडून गोरगरिबांना अन्न वाटपजुने नाशिकमधील युवकांनी एकत्र येत स्थापन केलेल्या ‘खिदमत’ फाउंडेशनकडून शब-ए-मेराजच्या औचित्यावर शहरातील गोदाकाठ, बसस्थानक, रेल्वेस्थानक, पंचवटी, जिल्हा रुग्णालय आदी भागात गोरगरिबांना अन्नाचे वाटप करण्यात आले. सुमारे २५ ते ३० किलो व्हेज पुलाव तयार करून प्रत्येकी ७०० ग्रॅमची पाकि टे या सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून वाटण्यात आल्याची माहिती नायब काझी एजाज सय्यद यांनी दिली.

टॅग्स :Muslimमुस्लीमIslamइस्लामMosqueमशिदNashikनाशिक