नाशिक : जन्मदात्या पित्याने आपल्या १७ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण करीत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात संशयित पित्याविरुध्द ‘पोस्को’ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नाशिक-पुणे महामार्गावरील बजरंगवाडी झोपडपट्टी परिसरात राहणारा एक कुटुंबप्रमुख पिता आपल्या मुलीला आंघोळ करत असताना दरवाजाच्या फटीतून बघत होता, असे पीडित मुलीच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे. मुलगी आंघोळ करून बाहेर आल्यानंतर ४२ वर्षीय पित्याने घरी कोणी नसल्याची संधी साधत मुलीला धक्का मारून पलंगावर लोटले. मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत पुढे म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित पित्याविरुध्द बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा (पोस्को) अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
जन्मदात्याकडून मुलीचे लैंगिक शोषण : पित्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 21:30 IST
जन्मदात्या पित्याने आपल्या १७ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण करीत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
जन्मदात्याकडून मुलीचे लैंगिक शोषण : पित्यास अटक
ठळक मुद्दे मुंबई नाका पोलीस ठाण्यात संशयित पित्याविरुध्द ‘पोस्को’ कायद्यान्वये गुन्हा४२ वर्षीय पित्याने घरी कोणी नसल्याची संधी साधत मुलीला धक्का मारून पलंगावर लोटले मुलीला आंघोळ करत असताना दरवाजाच्या फटीतून बघत होता