इंदिरानगर : खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा यांसारखे गुन्हे दाखल असलेल्या दोघा सराईत गुन्हेगारांना इंदिरानगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने गुरुवारी (दि़ ४) रात्रीच्या सुमारास सापळा रचून अटक केली़ या दोघांकडून देशी बनावटीचे पिस्तूल व दोन चॉपर जप्त करण्यात आले असून, अटक करण्यात आली आहे़ दरम्यान, या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली़अंबड व सातपूर पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार संशयित नीलेश विनायक कोळेकर (२२, शिवशक्ती चौक, सिडको) व विकास सुरेश जाधव (२०, रा़ राधाकृष्णनगर, अशोकनगर) हे दोघे शस्त्रासह पाथर्डी फाट्यावर येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सावंत यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली़
सराईत गुन्हेगारांकडून गावठी पिस्तूल, चॉपर जप्त
By admin | Updated: June 6, 2015 00:24 IST