सटाणा : औरंगाबाद येथील मोटारसायकल चोरीच्या रॅकेटचे सटाणा कनेक्शन उघडकीस आले आहे. शहरातील दोघा चोरट्यांना अटक करून सात मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. औरंगाबादच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. या कारवाईमुळे चोरीच्या मोटारसायकल घेणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. औरंगाबाद शहरातून गेल्या सहा महिन्यात पाचशेपेक्षा अधिक मोटारसायकली दिवसा ढवळ्या चोरीला गेल्या. मोटारसायकल चोरीचे वाढते प्रमाण पोलिसांपुढे एक आव्हानच होते. या चोऱ्यांचे आव्हान स्वीकारून औरंगाबादच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना नुकतेच मोठे रॅकेटच हाती लागले आहे. या रॅकेटचे कनेक्शन थेट सटाणा असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी शहरात सापळा रचून भाक्षी रोडवरील सागर अहिरे, बस स्थानक मागील शिवाजीनगरमधून अर्जुन पवार या दोघा चोरट्यांना अटक केली. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच औरंगाबाद शहरामधून चोरी करून सटाण्यात विक्र ी केलेल्या पाच पल्सर, एक बुलेट आणि एक यामाहा एफ झेड जप्त केल्या आहेत. तसेच वणी येथे विकलेली एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. दरम्यान या मोटारसायकल रॅकेटमध्ये सटाण्यातील एक जण अद्याप फरार असून प्रतिष्ठित घरातील काही तरु ण या रॅकेटमध्ये कार्यरत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.या प्रकरणी औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
सटाण्यात चोरीच्या सात मोटारसायकली जप्त
By admin | Updated: January 21, 2016 21:46 IST