दिंडोरी : येथील नारायण मोगल यांच्या दीड एकर द्राक्षबाग तार तुटल्याने मंगळवारी जमीनदोस्त झाली. गट क्र. ५५ मधील स्वमालकीच्या क्षेत्रात त्यांनी द्राक्षबागेची लागवड केली होती.चांगल्या प्रकारचा माल तयार झाल्याने द्राक्षबागेवर लोड आला होता. यातच सकाळच्या वेळी काही प्रमाणात हवाही सुटली होती. यातच बागेची तार तुटली व बघता बघता संपूर्ण द्राक्षबाग जमीनदोस्त झाली. यामुळे त्यांचा दीडशे क्विंटल माल खराब होऊन सुमारे पाच लाखांचे व तार, बांबू व अॅँगलचे सुमारे दोन लाखांचे असे सुमारे सात लाखांचे नुकसान झाले. दरम्यान, लखमापूरचे तलाठी भोये व कृषी पर्यवेक्षक संदीप बोरवे यांनी नुकसानग्रस्त बागेची पाहणी करून पंचनामा केला आहे. (वार्ताहर)
द्राक्षबाग पडल्याने सात लाखांचे नुकसान
By admin | Updated: February 9, 2016 22:33 IST