मालेगाव : शहरातील गोंडवाडा भागातील टपरीवर गांजा विक्री करणाऱ्या बिजू वान्या ऊईके व इस्माईल पहेलवान या दोघांविरुद्ध गांजा विक्री प्रकरणी आयेशानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ६७ हजार २०० रूपये किंमतीचा ६.५ किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी बिजू वान्याला अटक करण्यात आली आहे. फरार इस्माईल पहेलवान याचा पोलीस शोध घेत आहेत.अपर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, आयेशानगरचे पोलीस निरीक्षक मसूद खान यांना आयेशानगर पोलीस ठाणे हद्दीतील गोंडवाडा भागात गांजा विक्री केला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक खान हे करीत आहेत.
मालेगावी सहा किलो गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 17:51 IST