शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

घरपट्टी नोटिसांवर तोडग्यास आयुक्त सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 01:32 IST

शहरातील नागरिकांवर आधीच टाकण्यात आलेला कराचा बोजा त्यानंतर आता सर्वेक्षणाच्या नावाखाली देण्यात आलेल्या नोटिसा यामुळे नागरीक मेटाकुटीस आले आहेत.

नाशिक : शहरातील नागरिकांवर आधीच टाकण्यात आलेला कराचा बोजा त्यानंतर आता सर्वेक्षणाच्या नावाखाली देण्यात आलेल्या नोटिसा यामुळे नागरीक मेटाकुटीस आले आहेत. शेतीसह विविध मिळकतींवर भरमसाट करवाढ करण्यास आधार असलेला माजी आयुक्तांचा दि.३१ मार्च रोजी वार्षिक भाडेमूल्य वाढीचा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी अन्याय निवारण कृती समितीने आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केली आहे. विशेष म्हणजे आयुक्त गमे स्वत: या विषयावर अभ्यास करून सध्या सुरू असलेल्या मिळकतींच्या नोटिसांवर तोडगा काढण्यासाठी सकारात्मक आहेत.समितीच्या वतीने शुक्रवारी (दि.२१) आयुक्त राधाकृष्ण गमे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करवाढ करताना शेतीवरदेखील कर लादला असून, तो रद्द करण्याची मागणी प्रतिनिधी मंडळाने केली.  महापालिकेने जुन्या मिळकतींवर १८ टक्के करवाढ करण्यास मान्यता दिली होती. मात्र माजी आयुक्तांनी हा निर्णय फिरवून त्यापेक्षा अधिक करवाढ केली आहे त्यातच माजी आयुक्तांनी ३१ मार्च रोजी वार्षिक भाडेमूल्यात वाढ केली असून, त्यामुळे भरमसाठ करवाढ झाली आहे. महापालिकेला मिळकतीवर कर लागू करण्याचा अधिकार आहे. मात्र, माजी आयुक्तांच्या आदेश क्रमांक ५२२ नुसार व्यावसायिक आस्थापनांवर अधिक कर आकारणी केली आहे. वास्तविक अशाप्रकारच्या उत्पन्नावर कर आकरणीचे म्हणजेच आयकर वसुलीचे अधिकार शासनाला आहेत. त्याचप्रमाणे इमारतीचे मूल्यांकन करताना यापूर्वी चटई क्षेत्र विचारात घेतले जात होते मात्र नव्या करप्रणालीत बिल्टअप क्षेत्रावर आकारणी केली जात असून, त्यामुळे बिल्टअप क्षेत्र उपलब्ध नसल्यास चटई क्षेत्राच्या किमान २० टक्के अधिक बांधकाम क्षेत्र विचारात घेऊन करमूल्य निश्चित करण्यात येणार आहेत. तथापि, यामुळे भ्रष्टाचार होत असल्याचे निदर्शनास आणून किमान हा शब्द वगळावा असे नमूद करण्यात आले आहे. अशा अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी समितीचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, उपाध्यक्ष दत्ता गायकवाड, सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे, सल्लागार उन्मेष गायधनी, दामोदर मानकर यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcommissionerआयुक्त