शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात साडेपाच हजार प्रकरणांचा निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 01:16 IST

तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघाच्या वतीने येथील न्यायालयात आयोजित लोकन्यायालयाच्या माध्यमातून पाच हजार ७८८ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. या वादपूर्व प्रकरणातून सुमारे एक कोटी ३० लाख ४५ हजार रुपयांची वसुलीदेखील करण्यात आल्याची माहिती न्यायाधीश पी. जी. तापडिया यांनी दिली.

सटाणा : तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघाच्या वतीने येथील न्यायालयात आयोजित लोकन्यायालयाच्या माध्यमातून पाच हजार ७८८ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. या वादपूर्व प्रकरणातून सुमारे एक कोटी ३० लाख ४५ हजार रुपयांची वसुलीदेखील करण्यात आल्याची माहिती न्यायाधीश पी. जी. तापडिया यांनी दिली.  येथील न्यायालयाच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या लोकन्यायालयाचे उद्घाटन प्रथमवर्ग न्यायालयाचे न्यायाधीश पी. जी. तापडिया यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास न्यायाधीश व्ही.ए. आव्हाड, वकील संघाचे अध्यक्ष पंडितराव भदाणे, सरकारी वकील बोराळे, प्रांत प्रवीण महाजन, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, विस्तार अधिकारी नितीन देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित  होते.  सर्वाधिक वसुलीत ग्रामपंचायत, पतसंस्था तसेच न्यायालयाच्या प्रलंबित प्रकरणे, दरखास्ती मोटर वाहन कायद्यान्वये फौजदारी प्रकरणे यशस्वीरीत्या तडजोडीने निकाली काढण्यात आली असून, वादपूर्व प्रकरणातून सुमारे एक कोटी ३० लाख ४५ हजार रु पयांची वसुली करण्यात आल्याचे न्यायाधीश तापडिया यांनी सांगितले.यावेळी सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील, जायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, वकील संघाचे अभिमन्यू पाटील, रवींद्र पाटील, सतीश चिंधडे, नितीन चंद्रात्रे, चंद्रशेखर पवार, प्रकाश गोसावी, यशवंत सोनवणे, नीलेश डांगरे, संजय सोनवणे, संजय अहिरे, के.पी. भदाणे, वसंत सोनवणे, विष्णू सोनवणे, गंगाधर सोनवणे, विश्वास सोनवणे, प्रशांत भामरे, रेखा शिंदे, सुजाता पाठक, स्मिता चिंधडे उपस्थित होते. लोकन्यायालयात ग्रामपंचायत, सहकारी सोसायटी, पतसंस्था, बँका यांचा मोठा सहभाग होता. लोकन्यायालयात दाखल पूर्व ११ हजार ८५० व न्यायालयीन प्रकरणे, दिवाणी दावे, दरखास्ती व फौजदारी प्रकरणे ६३५ ठेवण्यात आली होती. दिवसभरात दाखल पूर्व ५७०० व न्यायालयीन प्रकरणे, दिवाणी दावे, दरखास्ती व फौजदारी असे एकूण ८८ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक