शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत लवकरच काढणार तोडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:16 IST

कामगार दिन १ मेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरोग्य विद्यापीठ कंत्राटी कर्मचाºयांनी सुरू केलेले आंदोलन ठोस तोडगा निघेपर्यंत सुरूच राहणार असल्याचे सिटूच्या नेत्यांनी जाहीर केले आहे. सिटूच्या नेत्यांनी या प्रकरणी शुक्रवारी पोलीस आयुक्तांशी चर्चा करून सर्व पुरावे सादर केल्यानंतर पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी जिल्हाधिकाºयांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असून, विद्यापीठाला जिल्हाधिकाºयांकडे चर्चेसाठी बोलावण्यात येणार असल्याचे समजते.

नाशिक : कामगार दिन १ मेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरोग्य विद्यापीठ कंत्राटी कर्मचाºयांनी सुरू केलेले आंदोलन ठोस तोडगा निघेपर्यंत सुरूच राहणार असल्याचे सिटूच्या नेत्यांनी जाहीर केले आहे. सिटूच्या नेत्यांनी या प्रकरणी शुक्रवारी पोलीस आयुक्तांशी चर्चा करून सर्व पुरावे सादर केल्यानंतर पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी जिल्हाधिकाºयांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असून, विद्यापीठाला जिल्हाधिकाºयांकडे चर्चेसाठी बोलावण्यात येणार असल्याचे समजते.  आरोग्य विद्यापीठाच्या कंत्राटी कर्मचाºयांनी समान काम आणि समान दाम या मागणीसाठी गेल्या पाच महिन्यांपासून आंदोलन सुरू केले आहे, तर १ मेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. उपोषणकर्त्यांपैकी सहा कर्मचाºयांची प्रकृती खालावल्याने आंदोलनाला वेगळेच वळण मिळाले होते. विद्यापीठाच्या अधिकाºयांनी ऐनवेळी घूमजाव केल्यानंतर गुरुवारी रात्री पोलिसांनी उपोषणकर्त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र ऐनवेळी सिटूच्या नेत्यांनी विरोध केल्यामुळे पोलिसांना माघारी फिरावे लागले.याच प्रश्नावर शुक्रवारी सिटूचे राज्य सरचिटणीस डॉ. डी. एल. कराड, कॉम्रेड श्रीधर देशपांडे, सीताराम ठोंबरे, तानाजी जायभावे, कॉँग्रेस नेते शरद अहेर यांनी पोलीस आयुक्त सिंगल यांची भेट घेऊन उपोषण सनदशीर आणि कायदेशीर सुरू असल्याचे सांगितले. आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झालेला नसताना पोलीस आंदोलन दडपत असल्याचा आरोप करण्यात आला. उपोषण दोन दिवसांपूर्वीच मिटले असते; मात्र विद्यापीठाने घूमजाव केल्याचेही आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावेळी आयुक्तांनी या प्रकरणी लवकर तोडगा निघणे अपेक्षित असल्याचे सांगून विद्यापीठाचे प्रतिनिधी आणि जिल्हाधिकाºयांसमवेत चर्चा करून निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे सांगून यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले. परंतु निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार यावेळी नेत्यांनी केला.विद्यापीठाकडून दिशाभूलकंत्राटी कर्मचारी हे विद्यापीठाचेच असून, विद्यापीठाच्या वकिलाने विद्यापीठ हे ‘प्रिन्सपल एम्लॉयर’ असल्याचे कोर्टात यापूर्वीच सांगितल्याचे तसेच  मे. विशाल इंटरप्रायजेसने आपण या कर्मचाºयांची नियुक्ती केली नसून त्यांना कामावरून कमी करण्याचा प्रश्नच नसल्याने विद्यापीठाने त्यांना कामावरून कमी केल्याचे म्हटल्याने विद्यापीठ कंत्राटी कर्मचाºयांची जबाबदारी नाकारून दिशाभूल करीत असल्याचा आरोप सिटूने केला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय