शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दोन गटांत हाणामारी प्रकरणी सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 01:22 IST

शेतात नांगरणीवरून दोन गटांत चाडेगाव शिवारात सात वर्षांपूर्वी तुंबळ हाणामारीची घटना घडली होती. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्याचा खटला प्रथम वर्ग न्यायाधीश आरती शिंदे यांच्या न्यायालयात सुरू होता. दोन्ही गटांतील सात आरोपींना सहा महिन्यांची सक्तमजुरीसह आर्थिक दंडाची शिक्षा गुरुवारी (दि.९) सुनावली आहे.

ठळक मुद्देपरस्परविरोधी गुन्हा : सात सदस्य ठरले दोषी

नाशिक : शेतात नांगरणीवरून दोन गटांत चाडेगाव शिवारात सात वर्षांपूर्वी तुंबळ हाणामारीची घटना घडली होती. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्याचा खटला प्रथम वर्ग न्यायाधीश आरती शिंदे यांच्या न्यायालयात सुरू होता. दोन्ही गटांतील सात आरोपींना सहा महिन्यांची सक्तमजुरीसह आर्थिक दंडाची शिक्षा गुरुवारी (दि.९) सुनावली आहे.चाडेगावातील राम उर्फ बाळू गंगाधर सांगळे, बाळू बबन हुळहुळे यांच्यामध्ये वाद झाले होते. हुळहुळे यांच्या फिर्यादीनुसार आरोपी राम सांगळे, श्याम उर्फ काळू गंगाधर सांगळे, श्रीधर पंडित सांगळे, शंकर गंगाधर सांगळे (सर्व रा. चाडेगाव) यांनी संगनमत करून नांगरणी करण्यास विरोध केला. त्यावरून आरोपींनी हुळहुळे यांच्या भावाच्या डोक्यात लाकडी दंडुक्याने मारहाण करून दुखापत केली होती. तसेच राम सांगळे यांच्या फिर्यादीनुसार आरोपी कचरू बबन हुळहुळे, बाळू हुळहुळे, ज्ञानेश्वर बबन हुळहुळे (सर्व रा.चाडेगाव) यांनी ट्रॅक्टरने नांगरणी करून सांगळे यांच्या शेतामधील पाइपलाइन फोडली होती. त्यामुळे सांगळे कुटुंबीय त्यांना समजावून सांगत असताना हुळहुळे कुटुंबीयांनी लाकडी दंडुक्याने मारहाण करून दोघा सांगळे बंधूंना जखमी केलेहोते.याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात सांगळे आणि हुळहुळे कुटुंबीयांनी परस्परविरोधी मारहाणीची फिर्याद दाखल केली. या गुन्ह्यांचा तपास तत्कालीन पोलीस हवालदार बी. व्ही. थेटे यांनी करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणी सांगळे यांच्या वतीने सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. ए. पी. बागले यांनी, तर हुळहुळे यांच्या वतीने सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. एस. पी. घोडेस्वार यांनी बाजू मांडलीपाच हजारांचा दंडदोन्ही गुन्ह्यांतील आरोपींविरोधात साक्ष आणि परिस्थितीजन्य पुरावे आढळून आल्याने न्यायालयाने दोन्ही गटातील सात आरोपींंना सहा महिने सक्तमजुरी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय