शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

जुना तोफगोळा सापडल्याने खळबळ उडाली़

By admin | Updated: December 29, 2014 01:59 IST

जुना तोफगोळा सापडल्याने खळबळ उडाली़

नाशिकरोड : देवळाली गाव वालदेवी नदीपुलाखाली नवीन पुलाच्या बांधकामाचे काम सुरू असताना रविवारी दुपारी जुना तोफगोळा सापडल्याने खळबळ उडाली़ या घटनेची माहिती लष्कराला देण्यात आली असून, सोमवारी लष्कराचे पथक पाहणीसाठी येणार आहे़नाशिकरोडकडून देवळाली कॅम्पकडे जाताना डाव्या बाजूला वालदेवी नदीवर नवीन पुलाचे काम सुरू आहे़ रविवारी दुपारी जेसीबीच्या साहाय्याने उभारलेल्या पिलरची स्वच्छता व गाळ बाजूला करण्याचे काम सुरू होते़ दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास नवीन पुलाच्या पिलरजवळ उत्खननाचे काम सुरू असताना त्याठिकाणी जमिनीत दडलेला ब्रिटिशकालीन तोफगोळा आढळून आला़ त्यामुळे कामगारांची धावपळ उडाली व सर्वजन काम सोडून पळून गेले़ पंधरा दिवसांपूर्वीच रोटेशन पद्धतीने धरणातून सोडलेल्या पाण्याची पातळी दोन दिवसांपासून खालावलेली असल्याने हे काम हाती घेण्यात आले होते़ या घटनेची माहिती नाशिकरोड पोलिसांना समजताच दुय्यम पोलीस निरीक्षक युवराज गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली व बॉम्बशोधनाशक पथकाला पाचारण केले़ हा ब्रिटिशकालीन तोफगोळा पुलाखालून उचलून सुरक्षित ठेवण्यात आला असून, याबाबतची माहिती लष्कराला देण्यात आली़ मात्र रविवारची सुटी व सायंकाळ झाल्याने लष्करी विभागाचे पथक सोमवारी पाहणीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली़ या घटनेची माहिती नागरिकांना समजताच त्यांनी तोफगोळा पाहण्यासाठी गर्दी केली होती़ या तोफगोळ्याजवळ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, तो जिवंत आहे की वापरलेला हे लष्करी पथकाच्या पाहणीनंतरच स्पष्ट होणार आहे़ (वार्ताहर)