शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या ३६२ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 01:33 IST

नाशिक : जिल्हा परिषदेतील शिक्षक बदल्यांवरून सुरू झालेली पडताळणी आणि चुकीची माहिती सादर केल्याप्रकरणी समोर आलेल्या माहितीनंतर जिल्हा परिषदेने कारवाईचा इशारा दिला असतानाच दुसऱ्या बाजूला शिक्षकांना दिलासादेखील दिला आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील १२ वर्षं पूर्ण झालेल्या ३६२ प्रशिक्षित शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.

ठळक मुद्देसमितीचा निर्णय : बारा वर्षं पूर्ण झालेल्यांना लाभ

नाशिक : जिल्हा परिषदेतील शिक्षक बदल्यांवरून सुरू झालेली पडताळणी आणि चुकीची माहिती सादर केल्याप्रकरणी समोर आलेल्या माहितीनंतर जिल्हा परिषदेने कारवाईचा इशारा दिला असतानाच दुसऱ्या बाजूला शिक्षकांना दिलासादेखील दिला आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील १२ वर्षं पूर्ण झालेल्या ३६२ प्रशिक्षित शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.जिल्हा परिषद अंतर्गत बारा वर्षं पूर्ण झालेल्या शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणी देण्यात येते. यासाठी शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समिती नेमण्यात आली असून, माध्यमिक शिक्षण अधिकारी या समितीचे सदस्य सचिव तर प्राथमिक शिक्षण अधिकारी सदस्य आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचा निमंत्रित सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. या समितीने घेतलेल्या निर्णयानुसार शिक्षकांना वेतनश्रेणीचा लाभ मिळणार आहे.सन २०१६ पासून विविध कारणांनी वरिष्ठ वेतनश्रेणीचा प्रश्न प्रलंबित होता. यासाठी जिल्ह्णातून ७२६ प्रस्ताव प्राप्त झाले होते. या प्रस्तावांची छाननी केल्यानंतर ३५६ प्रस्ताव पात्र ठरले होते. या प्रस्तावांना समितीने मान्यता दिली असून, जिल्ह्णातील ३६२ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली आहे. दरम्यान, ३७० प्रस्तावात अपूर्तता असल्याने १५ दिवसांत सर्व बाबींची पूर्तता करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत.दरम्यान, सहा पदवीधर शिक्षकांनाही वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली आहे. यासाठी २५ प्रस्ताव प्राप्त झाले होते. यातील पाच प्रस्तावांना मान्यता देण्यात आली असून, १९ प्रस्तावांना त्रुटी पूर्ण केल्यानंतर मान्यता देण्यात येणार आहे.१२ पर्यवेक्षकांना कालबद्ध पदोन्नतीजिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत कार्यरत १२ पर्यवेक्षकांना कालबद्ध पदोन्नती देण्यात आली असल्याची माहिती महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी दिली.