शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिकांनी मार्गदर्शकाची भूमिका पार पाडावी : पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 01:13 IST

तरुणाईला व संपूर्ण समाजाला मार्गदर्शन करण्याची क्षमता व अधिकार ज्येष्ठांकडे आहे, म्हणून मार्गदर्शकाच्या भूमिकेतून ज्येष्ठ नागरिकांनी सामाजिक जबाबदारी पार पाडावी परंतु हे करीत असताना समोरच्यांना आपले सोन्याचे ताट द्या परंतु बसण्याचा पाट देऊ नका असा सल्ला वनाधिपती विनायकदादा पाटील दिला.

निफाड : तरुणाईला व संपूर्ण समाजाला मार्गदर्शन करण्याची क्षमता व अधिकार ज्येष्ठांकडे आहे, म्हणून मार्गदर्शकाच्या भूमिकेतून ज्येष्ठ नागरिकांनी सामाजिक जबाबदारी पार पाडावी परंतु हे करीत असताना समोरच्यांना आपले सोन्याचे ताट द्या परंतु बसण्याचा पाट देऊ नका असा सल्ला वनाधिपती विनायकदादा पाटील दिला.निफाड येथे निफाड शहर ज्येष्ठ नागरीक संघाच्या नवीन कार्यालयाचे उदघाटन पाटील यांच्या हस्ते झाले याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी त्रबंकरावं गुंजाळ होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार दिलीप बनकर, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे राज्यअध्यक्ष उत्तम तांबे , निफाडचे नगराध्यक्ष एकनाथ तळवाडे , उपनगराध्यक्ष स्वाती गाजरे , नगरसेवक राजाभाऊ शेलार ,निफाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अनिल कुंदे , वि. दा .व्यवहारे, शशांक सोनी, राजेंद्र राठी ,शिवाजी ढेपले , ह. भ. प पंडित महाराज कोल्हे , निफाड वि का सोसायटीच्या उपाध्यक्ष भारती कापसे, ब्रिजलाल भुतडा आदी मान्यवर होते. प्रारंभी प्रास्तविक ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव डॉ सोमनाथ आंधळे यांनी केले याप्रसंगी दिलीप बनकर, उत्तम तांबे , पंडीत महाराज कोल्हे, त्र्यंबकराव गुंजाळ , शिवाजी ढेपले , अनिल कुंदे यांची भाषणे झाली. याप्रसंगी निफाड पोलिस ठाण्याच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांचा वाढदीवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष सुधाकर कापसे, उपाध्यक्ष उत्तम गाजरे, खजिनदार साहेबराव कापसे, लासलगाव कृउबाचे संचालक सुभाष कराड, दत्ता उगावकर , विजय बोरा , तुकाराम उगले आदींसह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन सुहास सुरळीकर यांनी केले. आभार संपत व्यवहारे यांनी मानले.

टॅग्स :Nashikनाशिक