शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

ग्रामीण रु ग्णालयात ज्येष्ठांची परवड

By admin | Updated: January 10, 2016 23:05 IST

घोटी : दाखल्यांसाठी होते वणवण

घोटी : येथील ग्रामीण रु ग्णालयात येणाऱ्या वृद्धांची विविध दाखले घेण्यासाठी धडपड सुरू आहे. एका ६५ वर्षीय वृद्ध आजोबांची गाठ पडली. पांढरी दाढी, मळकटलेले कपडे, अनवाणी असलेल्या या वृद्धाशी सहज संवाद साधला असता, ज्येष्ठ नागरिकांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध सवलतींसाठी आवश्यक असणाऱ्या वयाचा दाखला मिळविण्यासाठी वृद्धांना किती खडतर प्रवास करावा लागतो याची अनुभूती आली.रेल्वे व परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात सवलत दिल्याने या सर्व सवलतीचा लाभ घेण्यासाठी वैद्यकीय अधीक्षकाच्या वयाच्या दाखल्याची आवश्यकता भासते. हा दाखला मिळविण्यासाठी वृद्ध नागरिकांची ग्रामीण रुग्णालयाकडून बोळवण केली जात असल्याची बाब या आजोबांशी केलेल्या चर्चेतून स्पष्ट झाली. नाशिक-नगर जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या आदिवासी पाड्यातून हे आजोबा दोन महिन्यापासून दर आठवड्याला तीस ते पस्तीस किलोमीटर अंतराचा प्रवास करून घोटीतील रु ग्णालयात वयाचा दाखला मिळविण्यासाठी हेलपाटे मारत आहेत. लांबलचक रांगेत उभे राहिल्यानंतर नंबर लागल्यानंतर कधी कागदपत्राची अपूर्तता, कधी वैद्यकीय अधीक्षक मीटिंगला गेलेले, तर कधी क्लार्क गैरहजर अशा अनंत कारणामुळे या आजोबांना ‘पुढच्या आठवड्यात या’ अशी उत्तरे ठरलेली असतात. तरीही नाराज न होता हे आजोबा पुन्हा हजर राहतात. चार मुले, सर्व सज्ञान पण उतारवयात मुलांनीही या आजोबांकडे पाठ फिरविलेली. अशा स्थितीत शासनाकडून वृद्धांना मिळणाऱ्या सानुग्रह निधीतून गुजराण होईल या अपेक्षेने त्यांनी तहसील कार्यालयाचे उंबरे झिजविले. मात्र यासाठी दाखल्याची गरज असल्याचे त्यांना समजताच त्यांची धडपड सुरू झाली. दाखले मिळविल्यानंतर खरा अडसर ठरला तो वयाच्या दाखल्याचा. दोन महिन्यापासून हा दाखला मिळविण्यासाठी या वृद्धाचा खडतर प्रवास सुरू आहे.घोटीतील ग्रामीण रु ग्णालयात वयाच्या दाखल्यासाठी वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांकडून आर्थिक फीची मागणी करून लूट केली जात असल्याची माहिती एका ज्येष्ठ नागरिकाने दिली. हा दाखला तत्काळ देण्यासाठी शंभर ते पाचशे रुपयांपर्यंतची मागणी होत असल्याची बाब या ज्येष्ठ नागरिकांनी स्पष्ट केली. एसटीच्या तिकिटात सवलत मिळण्यासाठी हवा असलेला वयाचा दाखला मिळविण्यासाठी घोटीतील दवाखान्यात चार-पाच चकरा झाल्या. कोणती कागदपत्रे नाहीत, काय करावे लागेल याची कोणीही माहिती देत नसल्याने विनाकारण हेलपाटे होतात. (वार्ताहर)