शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एसटीला ज्येष्ठ नागरिकांचे वय अजूनही ६५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:16 IST

शासनाकडून ६० वर्ष वयाच्या व्यक्तीला ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र दिले जाते. मात्र एसटी बसमध्ये तिकिटावरील ५० टक्केसवलत घेण्यासाठी ६५ वयाची अट असल्याने ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र असूनही त्यांना लाभ मिळत नसल्याने ज्येष्ठांमध्ये काहीशी नाराजी आहे.

एकलहरा : शासनाकडून ६० वर्ष वयाच्या व्यक्तीला ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र दिले जाते. मात्र एसटी बसमध्ये तिकिटावरील ५० टक्केसवलत घेण्यासाठी ६५ वयाची अट असल्याने ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र असूनही त्यांना लाभ मिळत नसल्याने ज्येष्ठांमध्ये काहीशी नाराजी आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये प्रवासी सवलत मिळविण्यासाठी वयाच्या अटीवरून अनेक मतप्रवाह आहेत. काही वाहक ६० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांना सवलत देतात, तर काही वाहक ६५ वर्षांची अट घालतात. याबरोबरच ज्येष्ठ नागरिक म्हणून असलेल्या ओळखपत्राच्या सतत्येबाबतही वाहकांकडून विचारणा होत असल्याने अनेकदा ओळखपत्रामधील वय आणि फोटोतील चेहरा यावरून वयाचा अंदाज लावून प्रवासाची सवलत नाकारली जात असल्याचेही प्रकार घडतात. काही ज्येष्ठ नागरिक ६० वर्ष असल्याने सवलतीसाठी आडून बसतात. शासनाकडून मिळालेल्या ओळखपत्राबाबतही अनेकदा प्रवासी आणि वाहकांमध्ये वाद होतात.एस.टी. बसने प्रवास करताना अजूनही ६५ वर्षे वय लागते, असे अनेकदा वाहकाकडून सांगितले जाते. एवढेच नाही तर बसस्थानकात विनावाहक-विनाथांबा बससाठी आगाऊ तिकीट बुकिंगसाठीही असाच अनुभव येतो.विधानसभेत यासंदर्भात उपस्थित लक्षवेधी सूचनेवरील उत्तरात त्यांनी यासंबंधीचा शासन निर्णय निर्गमित केल्याचे सांगितले होते. यामध्ये ज्येष्ठांसाठी सवलतींच्या अनेक विभागांबरोबरच एस.टी. विभागाचाही समावेश आहे, असे असतानाही एस.टी.ने प्रवास करताना ६० ते ६५च्या मधील वयोमर्यादा असणाऱ्या ज्येष्ठांची अजूनही कुचंबणा होते. ज्यांच्याकडे ज्येष्ठ नागरिकांची ओळखपत्रे (जी शासनाने निर्गमित केलेली आहेत.) ती दाखविल्यानंतर त्यांना ६५ वर्षे पूर्ण असल्याशिवाय ५० टक्के सवलतीचे तिकीट दिले जात नाही. याबाबत नेमके काय धोरण आहे. ज्येष्ठ नागरिकांचे वय ६० वर्षे केल्याचा आदेश अद्याप एस.टी. महामंडळाकडे आला नाही काय? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.गोंधळाची परिस्थिती कायम४ ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक उन्नती, त्ाणतणावातून मुक्त, उत्तम आरोग्यासाठी सामाजिक न्याय आणि विषेश सहाय्य विभागाने ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केले असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी संबंधित सर्व विभागांना सक्तीचे निर्देश दिले आहेत. सर्व प्रकारच्या लाभासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची मर्यादा ६५ वरून ६० वर्षे करण्यात आली असल्याची घोषणा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी जुलै २०१८ मध्ये केली होती.

टॅग्स :Nashikनाशिक