शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
3
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
4
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
5
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
6
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
7
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
8
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
9
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
10
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
11
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
12
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
13
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
14
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
15
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
16
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
17
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
18
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
19
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
20
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान

उमेदवारीवरून सेनेत बंडाळी? विधान परिषद : दराडे की सहाणे; गटबाजीमुळे दोन्ही गट सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:11 IST

नाशिक : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेत बंड होण्याची चिन्हे आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीच्या तोंडावर पक्षात बंडाळी उफाळणे शक्य तांत्रिक मुद्द्यावरून सहाणे यांची आमदारकी निसटली

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेत बंड होण्याची चिन्हे दिसू लागली असून, त्याची सुरुवात एकमेकांच्या भेटीगाठी घेण्यापासून झाली आहे. गत वेळचे पराभूत अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांनी उमेदवारीवर दावा केलेला असतानाच जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यासाठी एक गट कमालीचा सक्रिय झाल्यामुळे तूर्त दराडे यांचे पारडे जड दिसू लागल्याने प्रत्यक्षात निवडणुकीच्या तोंडावर पक्षात बंडाळी उफाळणे शक्य वाटू लागले आहे.येत्या दोन महिन्यांत प्रत्यक्ष या निवडणुकीचा फड रंगणार असला तरी, शिवसेनेत तो आत्तापासूनच उमेदवारीवरून रंगू लागला आहे. गत निवडणुकीत सेनेचे संख्याबळ कमी असतानाही अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांनी राष्टÑवादीचे जयंत जाधव यांच्याशी काट्याची टक्कर दिली होती. तांत्रिक मुद्द्यावरून सहाणे यांची आमदारकी निसटली. त्यामुळे सहा वर्षांपूर्वी पक्षासाठी दिलेल्या योगदानाचा विचार यंदाच्या निवडणुकीत होऊन आपल्यालाच उमेदवारी मिळेल अशी ठाम खात्री सहाणे यांना वाटू लागली आहे व त्यादृष्टीने सहाणे यांनी पक्षांतर्गंत प्रचारही सुरू केला आहे. सोशल माध्यमाचा वापर करून त्यांनी तसे संकेत देणे सुरू केले आहे. दुसरीकडे सेनेतील एका गटाने जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या उमेदवारीसाठी मोठी फिल्डिंग लावली आहे. मध्यंतरी दराडे यांनी मातोश्रीवर जाऊन पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन तशी तयारीही दर्शविल्याचे सांगण्यात येते. सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे दराडे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली असून, पक्षाने त्यांना कामाला लागण्याचे आदेशही दिले आहेत. सहाणे यांना दराडे यांच्या उमेदवारीची कुणकुण लागल्यामुळेच की काय त्यांनी पर्याय म्हणून भाजपाची उमेदवारी करण्याचीही तयारी सुरू केल्याचे मानले जात आहे, त्याचाच भाग म्हणून मध्यंतरी सहाणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.