शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सेनेच्या माजी मंत्र्याच्या पत्नीची नगरसेविकेला धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 00:17 IST

नाशिकरोड : विहितगाव नाका चौफुलीवर प्रभागातील रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्याचे कामकाज पहात असताना नगरसेविका सरोज अहिरे यांना माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या पत्नी शशिकला घोलप यांनी शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिली.याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.प्रभाग २२ च्या नगरसेविका सरोज अहिरे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात ...

ठळक मुद्दे गुन्हा दाखल

नाशिकरोड : विहितगाव नाका चौफुलीवर प्रभागातील रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्याचे कामकाज पहात असताना नगरसेविका सरोज अहिरे यांना माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या पत्नी शशिकला घोलप यांनी शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिली.याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.प्रभाग २२ च्या नगरसेविका सरोज अहिरे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार दिली आहे. विहितगाव नाका चौफुलीवर बुधवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास रस्त्यावर पडलेले खड्डे मनपा कर्मचारी बुजवत होते. त्या ठिकाणी अहिरे या कामांची पाहणी करत होत्या. फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत अहिरे यांनी नयना घोलप यांचा पराभव केला होता. तो राग मनात धरून माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या पत्नी शशिकला घोलप या गाडीतून जात असताना त्या ठिकाणी थांबून येथे काय तमाशा करतात, असे म्हणून शिवीगाळ करत गाडीतून उतरले तर तुला मारहाण करेल, अशी धमकी दिली, असे अहिरे यांनी तक्रारीत म्हटले आहे.याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात शशिकला घोलप यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा