शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

दिंडोरी नगरपंचायतीत भाजपला सेनेने झिडकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 22:44 IST

दिंडोरी : दिंडोरी नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपने शिवसेना-काँग्रेसशी हातमिळवणी करून सत्ता स्थापनेच्या हालचाली चालवल्या होत्या; परंतु शिवसेनेचे माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी भाजपला झुगारून राष्ट्रवादीचा हात धरल्याने भाजपचा मुखभंग झाला आहे. दरम्यान, भाजपचे नगरसेवक तटस्थ राहणार असल्याची माहिती गटनेत्या अरुणा रणजित देशमुख यांनी दिली आहे. त्यामुळे नगरपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता येणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देसेना-राष्ट्रवादीसोबत : भाजप नगरसेवक राहणार तटस्थ

दिंडोरी : दिंडोरी नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपने शिवसेना-काँग्रेसशी हातमिळवणी करून सत्ता स्थापनेच्या हालचाली चालवल्या होत्या; परंतु शिवसेनेचे माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी भाजपला झुगारून राष्ट्रवादीचा हात धरल्याने भाजपचा मुखभंग झाला आहे. दरम्यान, भाजपचे नगरसेवक तटस्थ राहणार असल्याची माहिती गटनेत्या अरुणा रणजित देशमुख यांनी दिली आहे. त्यामुळे नगरपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता येणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.दिंडोरी नगरपंचायत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणूक १५ फेब्रुवारी रोजी होत असून त्या पार्श्वभूमीवर भाजप गटनेत्या अरुणा रणजित देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, दिंडोरी नगरपंचायत निवडणुकीत दिंडोरीकरांनी माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-काँग्रेस आघाडीच्या सर्वाधिक ८ जागा निवडून देऊन राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात कौल दिला होता. त्या जनमताचा आदर राखून भाजप नगरसेवकांनी चारोस्कर गटासोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून घेतला होता. त्याप्रमाणे भाजपच्या नगरसेवकांनी चारोस्कर गटाला आपला निर्णय कळवला होता; परंतु माजी आमदार चारोस्कर गटाच्या सर्व अटी, शर्ती मानून सुद्धा अचानकपणे चारोस्कर गट व राष्ट्रवादी यांच्यात आघाडी झाल्याचे चारोस्कर गटाकडून समजले आहे. त्यामुळे भाजपचे चारही नगरसेवक पुढील कार्यकाळात सक्षम विरोधी पक्षाची भूमिका जनतेच्या हितासाठी बजावण्यास तयार आहेत. त्यानुसार भाजपने जनमताचा आदर राखत नगर पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतली आहे.यापुढे जनतेच्या प्रश्नावर लढत राहू असेही गटनेत्या अरुणा रणजित देशमुख यांनी सांगितले.शिवसेनेचा होणार नगराध्यक्षनिवडणुकीत शिवसेनेला सर्वाधिक ६ ,काँग्रेसला २, राष्ट्रवादीला ५ तर भाजपचे चार नगरसेवक निवडून आले होते. काँग्रेस शिवसेनेने आघाडी केली होती. त्यांना बहुमतासाठी एक जागा कमी होती. त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्याने भाजपची भूमिका निर्णायक ठरणार होती. भाजपला दोन्ही गटाकडून ऑफरची चर्चा होती; मात्र शिवसेना-राष्ट्रवादीने एकत्र येत महाविकास आघाडी करण्याचा निर्णय घेतला असून शिवसेनेचा नगराध्यक्ष होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.यानंतर भाजपने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे.प्रत्यक्ष नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडीपर्यंत काय राजकीय घडामोडी घडतात तसेच नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष म्हणून कुणाला संधी मिळते याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक