नाशिक : हरित नाशिक सुंदर नाशिक ही संकल्पना राबवत असताना हरित महाराष्ट्र अभियानात सहभागी होऊन प्रत्येकाने पर्यावरणवादी व्हावे, असे मत सामाजिक वनिकरण विभाग, नाशिक येथील मुख्य वनसरंक्षक व उपमहासंचालक अरविंद विसपुते यांनी सामाजिक वनिकरण विभागाद्वारे आयोजित हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत चर्चासत्रात व्यक्त केले. यावेळी १ जुलैपासून राबविण्यात येणाऱ्या हरित महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी चर्चासत्रासाठी उपस्थितांकडून सूचना मागविण्यात आल्या तसेच मागील वर्षी राबविण्यात आलेल्या अभियानात नाशिक जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. दरवर्षी १ आॅगस्टपासून राबविण्यात येणारे हे अभियान जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस असल्याने शासनाला विनंती करून एक महिना अगोदर घेत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. वनिकरण विभागाद्वारा ५ जून ते ३१ आॅगस्ट हा कालावधी वनमहोत्सव म्हणून राबविण्यात येऊन या महोत्सवात १५ आॅगस्ट या दिवशी वनमत्र्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे राज्यातील प्रत्येक शालेय आवारात किमान २० रोपे लावण्यात येणार असल्याचे वनिकरण विभागाने सांगितले. (प्रतिनिधी)
हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत चर्चासत्र
By admin | Updated: June 29, 2015 01:20 IST