शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
3
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
4
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
5
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
6
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
7
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
8
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
9
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
10
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
11
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
12
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
13
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
14
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
15
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
16
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
17
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
18
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
19
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
20
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण

वन्यजिवांसोबतची ‘सेल्फी’ पडणार महागात

By admin | Updated: October 18, 2015 22:43 IST

वनखाते गुन्हे दाखल करणार : सोशल मीडियावरील छायाचित्रांवर करडी नजर

विजय मोरे, नाशिकसर्पमित्र, प्राणिमित्र या गोंडस नावाखाली सर्प वा वन्यप्राणी पकडणाऱ्यांची व ते जवळ बाळगणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर थ्रिल म्हणून त्यांच्याबरोबर सेल्फी काढून ते सोशल मीडियावर टाकण्याचे खूळही वाढले आहे. सोशल मीडियामुळे संरक्षित वन्यप्राण्यांची तस्करी होण्याचे प्रकार समोर आले आहेत़ त्यामुळे आता अशाप्रकारे संरक्षित वन्यजिवांसमवेतचे छायाचित्र सोशल मीडियावर टाकणे अपराध ठरणार आहे. अशा उत्साही मंडळींच्या उत्साहाला आता चाप लागणार असून, सर्प वा वन्यप्राणी पकडल्यानंतर त्याच्यासमवेतचे फोटो सोशल नेटवर्किंग साइटवर टाकणाऱ्यांवर आता वनविभागाकडून गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती नाशिकचे वनपाल पी़ बी़ खैरनार यांनी दिली आहे़सद्यस्थितीत व्हॉट््सअ‍ॅप, फेसबुक यांसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सनी तरुणांबरोबरच वृद्धांवरही गारुड केले आहे़ संदेश, फोटो, व्हिडीओ आदान-प्रदान करण्याचे सर्वात वेगवान माध्यम म्हणून याचा वापर केला जातो आहे़ शहराच्या आसपास असणाऱ्या जंगलात फिरण्यासाठी जाणारे, सर्पांबाबतच्या जुजबी माहितीवरून एखाद्या ठिकाणी साप पकडण्यासाठी जाणारे व स्वत:ला ‘सर्पमित्र’ उपाधी लावणारे तरुण वन्यजिवांकडे थ्रिल म्हणून बघू लागले आहेत़ भारतीय वन कायद्यान्वये संरक्षित दर्जा प्राप्त असलेला साप वा नाग पकडल्यानंतर त्याचे हाल करीत फोटोसेशन करणे व स्वत:ची क्रेझ दाखविण्यासाठी ते फोटो सोशल नेटवर्किंग साइटवर टाकण्याचे प्रमाण वाढत चालले आहे़ त्यातून जनावरांचा ठावठिकाणा कळतो आणि मग त्यांची तस्करी करणाऱ्यांना अशा संरक्षित जनावरांचा शोध घेणे सोपे जाते. त्यामुळे वन्यप्राण्यांची तस्करी वाढत आहे. महत्त्वाचे म्हणजे, सोयीचे छायाचित्र काढण्यासाठी वन्यप्राण्यांचा छळ हा त्यांच्या जिवावर बेतण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्याचीच दखल घेत वनखात्याने हे पाऊल उचलल्याची माहिती वनपाल खैरनार यांनी दिली.सोशल नेटवर्किंग साइटवर वनविभागामार्फत लक्ष ठेवले जाणार असून, वन्यप्राण्यासोबत छेडछाड करणे, विनापरवानगी ते जवळ बाळगणे, त्यांचे फोटो टाकणे आता महागात पडणार असून, भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये अशा लोकांवर गुन्हे दाखल केले जातील. हा केवळ वनखात्याचा कोरडा इशारा नसून शहरात नाशिकमध्ये अशा उत्साही मंडळींचा शोध घेऊन त्यांना ताकीद देऊन सोडण्यात आले आहे.शहरातील काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी नागासोबतचे काही महिन्यांपूर्वीचे छायाचित्र व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक यांसारख्या सोशल मीडियावर ‘पोस्ट’ केल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले़ या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन या सर्वांना वनविभागाने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते़ या चौकशीत वन्यजिवांना त्रास देण्याचा वा गुन्हेगारी स्वरूपाचा हेतू नसल्याचे समोर आल्याने या सर्वांकडून लेखी हमी घेऊन सोडण्यात आले़ हे महाविद्यालयीन युवक असल्याने त्यांच्या भविष्याचा विचार करून सोडून देण्यात आले असले, तरी अशा प्रकारचे कृत्य पुन्हा केल्यास थेट गुन्हा दाखल करण्याची ताकीद देण्यात आली आहे़ नाशिक शहरातील ही केवळ एक घटना असली तरी, राज्यभरातच आता वनखात्याने सोशल मीडियावर नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सर्प पकडणारे वा दुर्मीळ वन्यजिवांना त्रास देऊन त्यांचे छायाचित्र काढून इतरांना आकर्षित करण्याच्या प्रवृत्तीला चाप बसून वन्यजिवांना एकप्रकारे मदत होणार असल्याचे वन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे़

भारतातील संरक्षित वन्यजीव

अंदमान जंगली डुक्कर, काळविट, हरीण, हिमालयीन ब्राऊन अस्वल, सिंह, भारतीय जंगली गाढव, गवा, चित्ता, ढगाळ चित्ता, मासे पकडणारे मांजर, चौशिंगा, सोनेरी वानर, हत्ती, बिबट्या (पँथर), लारीस (पांडा), कस्तुरी हरीण, वाघ, जंगली म्हैस, याक, सुसर, मगर, मऊ कवचाचे कासव (गंगेत आढळतात), समुद्री हिरवे कासव, अजगर, मोठा भारतीय सारंग, मोठा भारतीय धनेश, तांबड्या डोक्याचे बदक, पांढऱ्या पोटाची पाण्यावरची घार, सैबेरियन करकोचा, बंगाली सायाळ, वानर, हिमालयीन सासाळ, टोल (जंगली कुत्रे), कोल्हा, उडणारी घार, हिमालयीन काळे अस्वल, जंगली मांजर, लाल कोल्हा, अस्वल, धामण, नाग, किंग कोब्रा, घोणस, भेकर, मोर, खार, फुलपाखरू.या कायद्यान्वये गुन्हा दाखलदुर्मीळ व संरक्षित वन्यजिवांसोबतचे छायाचित्र सोशल नेटवर्किंग साईटवर (फेसबुक, व्हॉट्सअँप) टाकल्यास संबंधितावर भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२, आर्टिकल ९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

जखमी वन्यप्राण्यांना मदत करणे हा गुन्हा नाही किंवा एखाद्याच्या घरातील साप किंवा नाग पकडणेदेखील गुन्हा ठरत नाही. मात्र पकडल्यानंतर त्याची वनविभागात जाऊन नोंद करून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडणे गरजेचे आहे. या प्राण्यांना जवळ बाळगणे, त्यांचे प्रदर्शन करणे हा गुन्हा असून, अशा प्राण्यासोबतचे छायाचित्र सोशल मीडियावर टाकणेदेखील गुन्हा ठरणार असून, संबंधितांवर वन्य कायद्यान्वये गुन्हा दाखल केला जाणार आहे. - पी. बी. खैरनार, वनपाल, नाशिक.