शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

स्वनिर्मितीचा आनंद प्रत्यक्ष व्यावहारिक जीवनाचा अनुभव रामनगर शाळेत आनंद मेळाव्यानिमित्त कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:24 IST

सायखेडा : स्वनिर्मितीचा आनंद प्रत्यक्ष व्यावहारिक जीवनाचा अनुभव देत असल्याने शालेय जीवनात विद्यार्थीकेंद्रित अध्ययन अध्यापन पद्धतीचा अवलंब केला.

ठळक मुद्देज्ञानाच्या कक्षा रुंदावतातनागरिक शाळेतील बाजारात उपस्थित

सायखेडा : स्वनिर्मितीचा आनंद प्रत्यक्ष व्यावहारिक जीवनाचा अनुभव देत असल्याने शालेय जीवनात विद्यार्थीकेंद्रित अध्ययन अध्यापन पद्धतीचा अवलंब केला तर मुलांमध्ये सृजनशीलता आणि व्यावहारिक दृष्टिकोन निर्माण होत असतो याचा प्रत्यक्ष अनुभव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने आनंद मेळाव्याचे आयोजन करून प्रत्यक्ष आर्थिक व्यवहाराचा अनुभव घेतला.विद्यार्थ्याला पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष अनुभवातून घेतलेले आनंददायी शिक्षण मिळाल्यास ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात, स्वनिर्मितीचा आनंद मिळतो. विद्यार्थी सामाजिकदृष्ट्या, व्यावहारिकदृष्ट्या परिपूर्ण होतो हा अभिनव उपक्रामद्वारे सकाळी सर्व विद्यार्थी शाळेत घरातील खाद्य पदार्थ, आपल्या शेतात असलेला भाजीपाला, घरात असलेले धान्य घेऊन शाळेत आले. बाजार बसण्यासाठी घरातून पोती, बरदान घेऊन डोक्यावर भाजीपाल्याची घमेली, हातात वजन काट्याची पिशवी, गिºहायकाला सुटे पैसे देण्यासाठी काही पैसे घेऊन मुले १० वाजता शाळेत दाखल झाले. ११ वाजता मुलांनी घरी निरोप दिल्याप्रमाणे घरची माणसे, गावातील पदाधिकारी, नागरिक शाळेतील बाजारात उपस्थित झाले. अचूक रचना आणि मुलांचा उत्साह पाहून ग्रामस्थांनी घरी लागणारा भाजीपाला आणि किराणा वस्तू शालेय आठवडे बाजारात खरेदी केल्या. मुलांनी प्रत्यक्ष व्यवहार केले. पैशाच्या बदल्यात वस्तू देऊन अदान-प्रधान क्रि या अनुभवली. बेरीज, वजाबाकी, नफा-तोटा, असे व्यावहारिक उदाहरणे यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. शाळेच्या उपक्र माचे ग्रामस्थ, सायखेडा केंद्र आणि परिसरातील शिक्षकांनी कौतुक केले. यावेळी शांताराम पवार,सुनील बाविस्कर, नामदेव ठाकूर, संजीव बच्छाव, सुकदेव डोंगरे, सोनाली नाठे, पवार, राजभोज आदी उपस्थित होते. आठवडे बाजार ज्या प्रमाणे भरतो त्याप्रमाणे एका रांगेत भाजीपाला, दुसºया रांगेत फळे, तिसºया रांगेत धान्य, चौथ्या रांगेत किराणा वस्तू, अशी सुबक रचना करून बाजार मांडला.अचूक रचना आणि मुलांचा उत्साह पाहून ग्रामस्थांनी घरी लागणारा भाजीपाला आणि किराणा वस्तू शालेय आठवडे बाजारात खरेदी केल्या.