शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

युवकांचे प्रसंगावधान : इंदिरानगरमध्ये मोकाट गायींचा महिलेवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 15:57 IST

लहान मुलांमध्येही यामुळे भीतीचे वातावरण पसरले असून शाळांना सुट्ट्या लागूनदेखील मुले संध्याकाळच्या सुमारास कॉलनीमधील मोकळे भुखंड अथवा उद्यानांमध्ये खेळण्यास जाण्यासाठी जनावरांच्या भीतीपोटी तयार होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

ठळक मुद्दे अचानकपणे पाच ते सहा  गायींनी त्यांच्यावर चाल करत हल्ला चढविला. तातडीने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी

नाशिक : सकाळच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका ज्येष्ठ महिलेवर परिसरातील मोकाट जनावरांपैकी गायींनी हल्ला चढविला. या हल्ल्यात शोभना जोशी या गंभीर जखमी झाल्या. दरम्यान, परिसरातील काही युवकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखून धाव घेत गायीच्या तावडीत सापडलेल्या जोशी यांची सुटका केली.इंदिरानगर परिसरातील पाटील गार्डन येथील रहिवाशी असलेल्या जोशी या नेहमीप्रमाणे सकाळी आठ वाजेच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी घरातून निघाल्या. आत्मविश्वाससोसायटी लगत असलेल्या निरंजन पाक समोरून जात असताना अचानकपणे पाच ते सहा  गायींनी त्यांच्यावर चाल करत हल्ला चढविला. गायींनी शिंगानी लाथांनी मारण्यास सुरूवात केली. हा प्रकार सुधीर पाऊल, प्रवीण खरात,अजय खरात, कल्पेश सोनवणे, राहुल विंचूरकर यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ धाव घेत गायींना हुसक वून लावत जोशी यांना सुरक्षित ठिकाणी हलविले. दरम्यान, युवकांनी वेळीच धाव घेतली नसती तर मोठा अनर्थ झाला असता. कारण सर्वच गायी आक्रमक झालेल्या होत्या. त्यामुळे जोशी यांना त्यांच्यापासून बचाव करणे अवघड झाले होते. युवकांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे जोशी यांचा जीव वाचला; मात्र गायींच्या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली असून जवळच्या रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

परिसरात मोकाट जनावरे अक्षरशा हौदोस घातला असून त्यांना पकडण्याची मोहीम थांबली आहे. कारण संबंधित ठेकेदाराला सुमार दोन वर्षांपासून पैसे न दिल्याने त्याने काम थांबविल्याचे समजते. परिसरातील जनावरांचे मालक सकाळी आपल्या जनावरांना चराईसाठी सोडून देतात व सायंकळी पुन्हा आपल्या मालकाचा घरी मोकाट जनावरे परततात; परंतु या काळात ही मोकाट जनावरे रस्त्यावर किंवा मोकळ्या मैदानावर ठाण मांडून बसतात. दरम्यान, जनावरांकडून वाहनांवर तसेच पादचाऱ्यांवर हल्ले होण्याच्या घटना घडतात. लहान मुलांमध्येही यामुळे भीतीचे वातावरण पसरले असून शाळांना सुट्ट्या लागूनदेखील मुले संध्याकाळच्या सुमारास कॉलनीमधील मोकळे भुखंड अथवा उद्यानांमध्ये खेळण्यास जाण्यासाठी जनावरांच्या भीतीपोटी तयार होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. महापालिकेच्या संबंधित विभागाने याबाबत दखल घेऊन तातडीने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिकWomenमहिला