शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या संघटनांचे आत्मक्लेश आंदोलन

By admin | Updated: October 29, 2015 22:37 IST

शिक्षकांच्या संघटनांचे आत्मक्लेश आंदोलन

नांदगाव : केवळ पगारपत्रकावर स्वाक्षरी कुणी करायची या मुद्द्यावरून तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना पगार करता येत नसल्याने या प्रश्नावर प्राथमिक शिक्षक संघ,शिक्षक समतिी, प्राथमिक शिक्षक भारती,शिक्षक सेना व पदवीधर शिक्षक संघटना सह तालुक्यातील शिक्षकांच्या संघटनांनी एकित्रत येवून ३० आॅक्टोबरला पंचायत समिती कार्यालयावर आत्मक्लेश आंदोलन करण्याचा निर्णय गुरुवारी संयुक्त पत्रकान्वये कळविला आहे.दरम्यान, तालुक्यातील शिक्षण विभागाला गेल्या सव्वा दोन वर्षा पासून गट शिक्षणाधिकारी पद रिक्त असल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुकदेव बनकर, शिक्षकाधिकारी रहीम मोगल यांचे लक्ष वेधल्यानंतर देखील जिल्हा स्तरावरून कारवाई होत नसल्याने अखेर शिक्षक संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला सध्या तालुक्यात शिक्षणा धीकार्याचे पद रिक्त असल्याने या पदाचा पदभार कुणाही अन्य विस्तार अधिकारी अथवा त्यच्या समकक्ष अधिकार्याकडे सोपविले नसल्याने शिक्षण विभागाला वाली म्हणून कुणीच नाही अशा पाशर््वभूमीवर निर्णय घेणारी यंत्रणाच कार्यरत नसल्याचा परिणाम येथील कामकाजावर होवून ते ठप्प झाले आहे दरम्यान गुरूवारी दुपारी तालुक्याच्या गट विकास अधिकारी चित्रलेखा कोठावळे यांची संघाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र पाटील,शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कदम,शिक्षक भरतीचे जिल्हाध्यक्ष प्रकल्प पाटील, पदवीधरचे तालुकाध्यक्ष बाबूलाल ठोंबरे, शिक्षक सेनेचे तालुकाध्यक्ष संजय शेवाळे,आदींच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेत आपल्या समस्यांबाबत त्यांना निवेदन दिले. शिष्टमंडळात ललित पगार, किरण डोंगरे, सुनील बोरसे, कांतीलाल जाधव ,गणेश इनामदार,नवनाथ गिते, विठ्ठल बोरसे,विठोबा तुपे आदी विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. शिक्षण विभागाला अधिकारीच नसल्याने शिक्षकांनी घेतलेले कर्जाचे हप्ते थकून व्याज व दंडाची आकारणी या चा भुर्दंड सोसावा लागत आहे असे या निवेदनात म्हटले आहे बुधवारी गटविकास अधिकारी श्रीमती कोठावळे यांनी स्वाक्षरी करण्याची तयारी दर्शविली होती़