शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
2
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
3
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
4
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
5
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
6
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
7
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
8
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
9
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
10
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
11
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
12
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
13
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
14
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
15
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
16
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
17
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
18
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
19
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
20
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना

तिघा सदस्यांची निवड रद्दबातल

By admin | Updated: January 9, 2015 00:56 IST

तिघा सदस्यांची निवड रद्दबातल

मालेगाव : येथील महानगरपालिका स्थायी समितीच्या तिघा सदस्यांची गेल्या जुलै महिन्यात झालेली निवड मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविली आहे. तिसरी आघाडीचे गटनेते नरेंद्र सोनवणे यांच्या याचिकेवरील सुनावणीत न्यायालयाने हा निकाल दिला. त्यामुळे मनपातील संबंधित तिघा सदस्यांचे सदस्यत्व रद्द होऊन याचिकाकर्ते सोनवणे यांनी सुचित केलेल्या तिघा सदस्यांची निवड होणे क्रमप्राप्त आहे. मात्र या निर्णयामुळे कॉँग्रेसचे विद्यमान स्थायी समिती सभापती अस्लम अन्सारी यांचे सभापतिपदही धोक्यात आले आहे. मनपात १६ सदस्यीय स्थायी समिती आहे. गेल्या निवडीच्या विशेष महासभेत नऊ नूतन सदस्यांची निवड करण्यात आली होती.त्यातील सात सदस्यांची निवड ही मुदत संपुष्टात आल्यामुळे तर वर्षभरातंनर इतरांना संधी मिळावी म्हणून सेनेच्या दोघा सदस्यांची निवड झाली होती.या निवडणुकीवेळी तत्कालीन १९ सदस्य असलेल्या तिसरा महाज पार्टीचे गटनेता मोहम्मद सुलतान व तिसरा महाज आणि अपक्ष मिळून तयार झालेल्या २३ सदस्यीय तिसरी आघाडीचे गटनेते नरेंद्र सोनवणे यांच्यातील गटनेतेपदाचा वाद गाजला होता. त्यावेळी काँग्रेसने केलेल्या राजकीय खेळीत तिसरा महाज पार्टीचे गटनेता मोहम्मद सुलतान यांना फोडून आपल्या बाजूने वळविले होते. त्यामुळे तिसरी आघाडीचे गटनेते सोनवणे यांनी स्थायीसाठी सुचित केलेल्या सदस्यांच्या नावाचे पाकीट न फोडता तत्कालीन महापौर ताहेरा शेख यांनी सुलतान यांनी सुचित केलेल्या सदस्यांची नावे स्थायी सदस्य म्हणून जाहीर केली. अर्थात, या सदस्य निवडीच्या आधारे त्यानंतर मनपा स्थायी समिती सभापतिपदी कॉँग्रेसचे अस्लम अन्सारी यांची निवड झाली. या दरम्यान गटनेता सोनवणे यांनी मनपा स्थायी सदस्य निवडीस न्यायालयात आव्हान दिले. गेल्या महिन्यात मनपाच्या महापौरपद निवडीआधी सुलतान यांच्याऐवजी सोनवणे यांच्या गटनेतेपदावर शिक्कामोर्तब झाले होते. त्याआधारेच मनपात सत्तांतर होऊन कॉँग्रेसला महापौरपद गमवावे लागले. न्यायालयीन निकाल आणि बदलती राजकीय परिस्थिती यामुळे मनपातील स्थायी समिती सभापती कॉँग्रेसचे अस्लम अन्सारी यांचे पददेखील धोक्यात असल्याची मनपा वर्तुळात चर्चा आहे.