नाशिक : येथे होणार्या ४१ व्या जुनिअर आणि ३१ व्या सब ज्युनिअर राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी १४ मे रोजी निवड चाचणी होणार असल्याची माहिती जिल्हा संघटनेचे अध्यक्ष जे़ एम़ पवार यांनी दिली़ही निवड चाचणी बुधवार, दि़ १४ रोजी सावरकर जलतरण तलाव येथे सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे़ या निवड चाचणीतून २९ ते १ जूनदरम्यान होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संघाची निवड करण्यात येणार आहे़ चाचणीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे़
जलतरण स्पर्धेसाठी निवड चाचणी
By admin | Updated: May 6, 2014 20:53 IST