सर्वतीर्थ टाकेद : नाशिक येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आयोजित नाशिक जिल्हा कृषी महोत्सवात आदर्श शेतकरी गट म्हणून इगतपुरी तालुक्यातील जय श्रीराम कृषी विज्ञान मंडळ भरवीर बुद्रुक या मंडळाची निवड झाली आहे.जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते कृषी आदर्श शेतकरी गट पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कृषी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष संजय झनकर यांनी पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार नरेंद्र दराडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नयना गावित,नायगाव जिल्हा उपाध्यक्ष संजीव पडवळ व विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गटातील सहकारी सभासद वाळू झनकर, कृष्णा कांचार, जगन गोडे, बहिरू झनकर, रतन झनकर, कमलाकर झनकर, रावसाहेब जामकर, बाळासाहेब झनकर, शिवाजी झनकर, शरद झनकर, विजय झनकर, गोपाळ झनकर, भगवान जुंद्रे, एकनाथ जुंद्रे, भरत रायकर, संतोष झनकर, गोकूळ झनकर, विजय झनकर,आकाश झनकर, ऋ षिकेश झनकर या सभासद उपस्थित होते.
कृषी प्रदर्शनात भरवीरच्या गटाची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 17:18 IST
सर्वतीर्थ टाकेद : नाशिक येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आयोजित नाशिक जिल्हा कृषी महोत्सवात आदर्श शेतकरी गट म्हणून इगतपुरी तालुक्यातील जय श्रीराम कृषी विज्ञान मंडळ भरवीर बुद्रुक या मंडळाची निवड झाली आहे.
कृषी प्रदर्शनात भरवीरच्या गटाची निवड
ठळक मुद्देजय श्रीराम कृषी विज्ञान मंडळ भरवीर बुद्रुक या मंडळाची निवड झाली आहे.