शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआयच्या ४१ विद्यार्थ्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:55 IST

येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील डिझेल मेकॅनिक व्यवसाय अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या ४१ विद्यार्थ्यांची मारुती सुझुकी कंपनीने टेक्निशियन म्हणून निवड केली आहे. या निवडीमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

सातपूर : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील डिझेल मेकॅनिक व्यवसाय अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या ४१ विद्यार्थ्यांची मारुती सुझुकी कंपनीने टेक्निशियन म्हणून निवड केली आहे. या निवडीमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.  महाराष्ट्र सरकार आणि मारुती सुझुकी कंपनी यांच्यात नोव्हेंबर २०१७ मध्ये झालेल्या करारानुसार कंपनीने नाशिक येथील शासकीय आयटीआयमध्ये २० लाख रुपयांची गुंतवणूक करून डिझेल मेकॅनिक व्यवसाय अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना अद्ययावत तंत्रज्ञान आणि प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी मारुती के टेन ही नवीन गाडीदेखील भेट दिली आहे. यामुळे या विद्यार्थ्यांना वेगळे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता नाही. थेट प्रशिक्षित विद्यार्थी मारुती सुझुकी कंपनीला मिळणार आहेत. यावर्षी डिझेल मेकॅनिक व्यवसाय अभ्यासक्रम पूर्ण करणाºया ५३ विद्यार्थ्यांची मुलाखत घेण्यात आली. त्यापैकी ४१ विद्यार्थ्यांची (त्यात ९ मुलींचा समावेश आहे) निवड करण्यात आली आहे. या ४१ विद्यार्थ्यांना तत्काळ रोजगार उपलब्ध झाला आहे. मारुती सुझुकी कंपनीचे विभागीय व्यवस्थापक नवनीत आणि क्षेत्रीय व्यवस्थापक सनी वालिया यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना विविध डीलर्सकडे टेक्निशियन म्हणून नोकरी मिळणार आहे. यावेळी संस्थेचे प्राचार्य सुभाष कदम, उपप्राचार्य सतीश भामरे, गटनिदेशक प्रशांत बडगुजर, श्रीरत्न बर्डे आदी उपस्थित होते.  मारुती सुझुकी कंपनीने कुशल मनुष्यबळ मिळावे म्हणून पुणे, मुंबई, नागपूर आणि नाशिक येथील शासकीय आयटीआयमध्ये मोठी गुंतवणूक करून विद्यार्थ्यांना अद्ययावत तंत्रज्ञान आणि प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना त्वरित रोजगार उपलब्ध होणार आहे आणि कंपनीला कुशल मनुष्यबळ मिळणार आहे. तसा राज्य सरकार आणि कंपनी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.  - सनी वालिया,  विभागीय व्यवस्थापक, नाशिक

टॅग्स :Nashikनाशिक