शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अठरा लाख रुपयांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 01:14 IST

सिन्नर : तालुक्यातील ठाणगाव शिवारात रविवारी (दि. ११) पहाटे तीन वाजेच्या सुमारास केलेल्या धडक कारवाईत तब्बल अठरा लाखांचा गुटखा ताब्यात घेण्यात सिन्नर पोलिसांना यश आले. त्यामुळे राज्यभरात गुटखाबंदी असताना अवैध गुटखा विक्री सुरूच असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देसिन्नर : १७ लाख ७० हजार रुपये किमतीची ५९ पोती पोलिसांच्या ताब्यात गुटख्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पुण्याला पाठविले

सिन्नर : तालुक्यातील ठाणगाव शिवारात रविवारी (दि. ११) पहाटे तीन वाजेच्या सुमारास केलेल्या धडक कारवाईत तब्बल अठरा लाखांचा गुटखा ताब्यात घेण्यात सिन्नर पोलिसांना यश आले. त्यामुळे राज्यभरात गुटखाबंदी असताना अवैध गुटखा विक्री सुरूच असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.ठाणगाव शिवारात एक मालट्रक संशयास्पद उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून ठाणगाव-केळी रस्त्यावरून शिवारात मालट्रक (एचआर ३८, एक्स १२३६) ताब्यात घेऊन संबंधित मालट्रकचालक कल्लू बगेल (२६, रा. कांधी, ता. जि. शिवपुरी, मध्य प्रदेश) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. मालट्रकची तपासणी केली असता वॉव (डब्लूओडब्लू) नावाच्या गुटख्याची १७ लाख ७० हजार रुपये किमतीची तब्बल ५९ पोती पोलिसांनी ताब्यात घेतली. पोलिसांनी घटनेची माहिती अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाला दिली. अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. पाटील व एच. के. बाविस्कर यांनी गुटख्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पुण्याला पाठविले. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे, पोलीस हवालदार नितीन मंडलिक, पोलीस नाईक बाबा पगारे, भगवान शिंदे, प्रवीण गुंजाळ, शहाजी शिंदे आदींनी कारवाईत सहभाग घेतला.