शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

ओळीत लागवड केल्यास बियाणांची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 00:25 IST

नाशिक : चारसूत्री भात लागवड पद्धतीतील तिसरा टप्पा म्हणजे नियंत्रित लावणी. शेतकरी त्यास ओळीत लागवड, जपानी लागवड म्हणूनही ओळखतात. या पद्धतीने लावणी केल्यास प्रतिहेक्टरी ४० ते ४५ किलोऐवजी ३० किलो बियाणात लागवड पूर्ण होते.

नाशिक : चारसूत्री भात लागवड पद्धतीतील तिसरा टप्पा म्हणजे नियंत्रित लावणी. शेतकरी त्यास ओळीत लागवड, जपानी लागवड म्हणूनही ओळखतात. या पद्धतीने लावणी केल्यास प्रतिहेक्टरी ४० ते ४५ किलोऐवजी ३० किलो बियाणात लागवड पूर्ण होते.लावणी ओळीमध्ये १५-२५, १५-२५ सें.मी. अंतरावर करावी. त्यासाठी प्लॅस्टिक दोरीवर १५ सेंमी, २५ सेंमी अंतरावर आलटून-पालटून बांबूच्या लहान काड्या खोचून खुणा कराव्यात. सुधारित लावणी दोरीवर १५ सें.मी. अंतरावर असलेल्या खुणांवर प्रथम एक व नंतर दुसरा चूड लावावा. अशा प्रकारे एकावेळी जोड पद्धत वापरून त्याच दोरीत लावणीचे काम पूर्ण करावे. खाचरात १५ सेंमी बाय १५ सेंमी चुडाचे चौकोन व २५ सेंमी चालण्याचे रस्ते तयार होतात. लावणी करताना प्रत्येक चुडात दोनच रोपे लावावीत. या पद्धतीने लावणी केल्यास मजूर कमी लागतात. आंतरमशागत करणे, चौरसात खताच्या ब्रिकेट देणे सोपे जाते.चौथ्या टप्पा म्हणजे युरिया ब्रिकेटचा वापर करणे. यालाच शेतकरी गोळी खत म्हणून ओळखतात. युरिया व डीएपी डायअमोनियम फॉस्फेट या दोन खतांचे अनुक्रमे ६०:४० प्रमाणात मिश्रण करून ब्रिकेटिंग मशीनच्या साहाय्याने ब्रिकेट गोळी तयार करतात.ब्रिकेटचा वापर भातलावणीनंतर लगेचच किंवा दुसऱ्या दिवशी करावा. १५ बाय १५ सेंमीच्या चौकानाच्या मधोमध चार चुडास एक ब्रिकेट ५ सेंमी खोचावा. ब्र्रिकेटच्या वापरामुळे हेक्टरी ४४ किलो नत्र, २० किलो स्फुरदची बचत होते. तणाला अन्नद्रव्य मिळतात, त्यामुळे तणाचा त्रास कमी होतो. गोळी खताच्या वापरामुळे नत्र-स्फुरदयुक्त अन्नद्रव्ये वाहून जात नाही. दिलेल्या खतापैकी अधिकाधिक अन्नद्रव्ये भात पिकास उपयोगी पडतात.---------------पिकाची वाढ होते जोमदारचारसूत्री भात लागवड पद्धतीने लागवड खर्चात बचत होते. लावण्याच्या आणि कापण्याच्या कामासाठी लागणाºया मजुरांची संख्या कमी लागत असल्याने मजुरीच्या खर्चात ४० टक्क्यांपर्यंत बचत होते. पिकात हवा खेळती राहत असल्याने रोग, किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. पिकाची वाढ जोमदार होऊन उत्पादनातही वाढ होते.

टॅग्स :Nashikनाशिक